Western Railway: पश्चिम रेल्वेवर ट्रॅक दुरुस्तीसाठी पुढील ६० दिवस ब्लॉक जाहीर झाला आहे. यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकावर येणाऱ्या गाड्या दादरला वळवण्यात येत आहेत. काही गाड्या रद्दही झाल्या आहेत. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.
हा ब्लॉक 23 नोव्हेंबरपासून लागू झाला असून पुढील दोन महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या काळात पर्यायी व्यवस्थांचा अवलंब करावा लागणार आहे. काही गाड्या दादर स्थानकावर वळवण्यात आल्या आहेत तर दादर–मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती पश्चिम रेल्वेचे चीफ पीआरओ विनीत अभिषेक यांनी दिली आहे.
रेल्वेप्रवाशांसाठी मोठी बातमी! 10 दिवसांचा मेगाब्लॉक, पुण्याहून सुटणाऱ्या अनेक ट्रेन्स रद्द, पाहा लिस्ट
या ब्लॉकमुळे खालील महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे:
22946 ओखा – मुंबई सेंट्रल एक्सप्रेस
22210 हजरत निजामुद्दीन – मुंबई सेंट्रल एक्सप्रेस
09086 इंदोर – मुंबई सेंट्रल एक्सप्रेस
09076 काठगोदाम – मुंबई सेंट्रल एक्सप्रेस
09183 कानपूर अन्वरगंज – मुंबई सेंट्रल एक्सप्रेस
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना याचा विचार करूनच प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त 12 स्पेशल लोकल
दरम्यान, मध्य रेल्वेने 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापरिनिर्वाण दिनासाठी 12 स्पेशल उपनगरी गाड्यांचे संचालन करण्याचा निर्णय घेतला आहे. चैत्यभूमी, दादर येथे जाणाऱ्या मोठ्या संख्येतील भाविकांची सोय करण्यासाठी ही गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेनुसार, शुक्रवार ते शनिवार मध्यरात्री परळ-कल्याण व कुर्ला-पनवेल या मार्गांवर स्पेशल लोकल चालवण्यात येतील. या सेवा रात्री 12.45 ते पहाटे 4 वाजेपर्यंत कल्याण, ठाणे, परळ, कुर्ला, वाशी आणि पनवेल या प्रमुख स्थानकांवरून धावतील.
ayodhya paul राणे पिता-पुत्रांवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सोडलं नाही…अयोध्या पौळ बेक्कार बोलल्या
उत्तर रेल्वेचा धुक्यामुळे मोठा निर्णय
यासोबतच, उत्तर भारतात डिसेंबर ते मार्च दरम्यान वाढणाऱ्या धुक्याच्या तीव्रतेमुळे उत्तर रेल्वेकडून बऱ्याच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पहाटे व उशिरा रात्री धावणाऱ्या गाड्यांवर धुक्याचा मोठा परिणाम होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
