छत्रपती संभाजीनग येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक व्यक्ती एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी गेली असता त्या व्यक्तीचं कार्ड मशीनमध्ये अडकलं. यानंतर त्याच्या बँक खात्यातून 43 हजार रुपये लंपास झाल्याची घटना घडली.
संजय जाधव हे एअर इंडिया कंपनीत सिनीअर ऑफीसर म्हणून काम करतात. ते १ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान चिकलठाणा भागातील आंबेडकर चौक येथील एसबीआय सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढल्यानंतर त्यांचे एटीएम कार्ड हे एटीएम मशीनमध्ये फसले. त्यांनी दहा मिनीट पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण एटीएम निघाले नाही. दरम्यान याच एटीएम मशीनमध्ये थांबलेल्या व्यक्तीने मुकुंदवाडी सिग्नल येथून मदत घेऊन येण्याचा सल्ला दिला.
अनंत गर्जेच्या शरीरावर 28 जखमा, पोलिसांनी अनंतच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला
फसवणूक करणाऱ्यानेच दिला मदतीचा सल्ला
दरम्यान, संजय जाधव हे दहा मिनीटापासून एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी झटत होते. त्यांचं एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकलं होतं. एटीएम कार्ड काढण्यासाठी संजय जाधव यांनी एटीएममधून पैसेही काढण्याचा प्रयत्न केला. ही प्रक्रिया त्यांच्यामागे उभा असलेला व्यक्ती पाहत होता. त्याने संजय जाधव यांचे एटीएमचे पासवर्डही चोरून बघितले. यानंतर संबंधीत व्यक्तीने संजय जाधव यांना मुकुंदवाडी सिग्नलवर एक एटीएम आहे. तिथे जा जो वॉचमन आहे, त्याला मदतीसाठी घेऊन या, असे सांगून त्यांना एटीएम सेंटर सोडण्यास भाग पाडले.
मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर अभूतपूर्व राडा, शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप
अवघ्या काही मिनीटात ४३ हजार गायब
संजय जाधव यांचे एटीएम अडकल्यामुळे ते मदत घेण्यासाठी मुकुंदवाडी सिग्नलकडे जात होते. संजय जाधव यांनी एटीएम सोडून रस्ता क्रॉस केला. तेथून ते मुकुंदवाडी सिग्नलकडे जाणार तेव्हा त्यांना अननोन कॉल आला. तुमच्या खात्यावरून पैसे ट्रान्सफर होत आहे. ते एटीएम सेंटरकडे गेले असता, त्यांना त्यांचा एटीएम कार्ड दिसलं नाही. त्यांच्या खात्यावरून काही मिनीटातच अन्य एटीएम कार्डावरून ४३ हजार रूपये गायब झाल्याचा मॅसेज आला. या प्रकरणात संजय जाधव यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे गाठून या प्रकरणात संशयीत व्यक्तीच्या विरेाधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार रंणजितसिंग मदनसिंग चव्हाण हे करीत आहेत.
