• Fri. Mar 6th, 2026
    गजानन मामीडवारला खांद्यावर धरुन नाचवलं, आंचलसह तिच्या वडिलांसोबत बेभान होऊन नाचला; सक्षमला मारण्याआधीचे VIDEO व्हायरल

    Nanded Saksham Tate and Anchal Dance Video : आंतरजातीय प्रेम प्रकरणातून १९ वर्षीय तरुण सक्षम ताटेच्या हत्येनं संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे. प्रेयसीच्या वडील आणि भावांनी मिळून सक्षमची निर्घृण हत्या केली. यातील मयत आणि मारेकऱ्यांचा जुना व्हिडीओ समोर आला आहे.

    सक्षम ताटे आंचल मामीडवार डान्स व्हिडिओ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नांदेड : नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून 20 वर्षीय तरुण सक्षम ताटेच्या हत्येने संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे. प्रेयसीच्या वडील आणि भावांनी मिळून सक्षमची निर्घृण हत्या केली. हत्येची ही घटना उघडकीस येताच सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार हिने त्याच्या मृतदेहासोबत लग्न केलं आहे. आयुष्यभर सक्षमला साथ देणार, त्याच्या कुटुंबीयांसोबत राहणार, असा निर्णय आंचलने घेतला आहे. या सगळ्या घटनाक्रमानंतर आता आंचल, तिचे वडील गणेश मामीडवार आणि सक्षम ताटे या तिघांच्या डान्सचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिघेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत नाचत आहेत. यावरून सक्षम आणि मामीडवार कुटुंबीयांचे संबंध किती चांगले होते, हे दिसून येत आहे. या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    दोन्ही भाऊ आणि सक्षम चांगले मित्र

    आंचलचे वडील गजानन मामीडवार हे गेल्यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीत आंचल देखील त्यांच्यासोबत होती. गजानन मामीडवार या मिरवणुकीत सक्षमसोबत नाचले. आंचल आणि सक्षम देखील सोबत या मिरवणुकीत नाचताना दिसत आहेत. दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. नाचतानाचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. समक्षसोबत इतके चांगले संबंध असताना गजानन मामीडवार त्याचा घात करतील, असं कोणालाही वाटलं नव्हतं. आंचलने दिलेल्या माहितीनुसार, तिचे दोन्ही भाऊ आणि सक्षम खूप चांगले मित्र होते. यातूनच सक्षमचं आंचलच्या घरी येणं-जाणं होतं. यातूनच तीन वर्षांपूर्वी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पण या प्रेमाचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाला आहे.

    Maharashtra TimesMumbai News : मुंबईत फूटपाथवर चालताना गर्भवतीला प्रसववेदना; स्त्रियांच्या वस्त्रांचा आडोसा, महिला पोलीस कॉन्स्टेबलमुळे सुखरुप प्रसुती

    सक्षमची गोळ्या झाडून हत्या

    सक्षम ताटे हा नांदेड शहरातील इतवारा भागातील संघसेननगर येथील रहिवासी आहे. त्याच्या मित्राची बहीण आंचल मामीडवार सोबत प्रेमसंबंध सुरु होते. तीन वर्षांपूर्वी त्यांची इंस्टाग्राम ओळख झाली होती, त्यानंतर ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. मयत हा नेहमी मित्राच्या घरी यायचा. दरम्यान, त्यांच्या प्रेमाला मुलीच्या कुटुंबाचा विरोध होता. आंचलच्या कुटुंबियांनी सक्षमला समज दिली होती. तरी सुद्धा प्रेम प्रकरण सुरूच होते. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जुनागंज भागात सक्षमची गोळ्या झाडून आणि डोक्यात फरशी घालून निर्घृणपणे खून करण्यात आला.

    Maharashtra Timesहृदयद्रावक! लाडक्या मुलाचं लग्न जमवून परतताना भीषण अपघात, आई-वडिलांचा जागीच अंत; लेकराच्या चेहऱ्याकडे पाहून नातेवाईकांचा आक्रोश

    आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

    मुलीचे वडील गजानन मामीडवार, भाऊ साहिल मामीडवार आणि विधीसंघर्ष असलेल्या अन्य एका भावाने इतर सहकार्यासोबत मिळून हत्या केली. आरोपी आणि मयत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते. पोलिसांकडून एमपीडी अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आई-वडील दोन भावासह एकूण आठ जणांविरोधात खुनाचा आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा