मुंबई लोकलने प्रवास करताना नालासोपारा-वसईदरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसेच त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा तरुणही या घटनेत गंभीर जखमी झाला आहे.
नालासोपाराहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, कायम भेडसावणाऱ्या धोक्याची जाणीव करून देणारी भीषण घटना नालासोपारा–वसईदरम्यान घडली आहे. लोकलमधून पडल्याने दोन तरुणांना जीवघेणे पडसाद भोगावे लागले. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी अवस्थेत उपचाराधीन आहे.
2 दिवसांत तब्बल 1600 स्वयंसेवक प्रवासी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पहिली सिम्युलेशन चाचणी यशस्वी
प्रतीश बाळाराम बोले (वय 35) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर नानासाहेब बंधने (वय 32) हा त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. नोकरीनिमित्त नालासोपाऱ्यात वास्तव्यास असलेला प्रतीश बोले हा घटनेच्या दिवशी विरार रिटर्न ट्रेन पकडण्यासाठी नालासोपारा–चर्चगेट लोकलमध्ये चढला. मात्र प्रचंड गर्दीमध्ये दरवाजात लटकून उभे असताना त्याचा हात सुटला आणि तो वेगाने धावणाऱ्या ट्रेनमधून खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी धावून गेलेल्या नानासाहेब बंधनेलाही गंभीर दुखापत झाली.
नाना पटोले यांच्याकडून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडणार असल्याचे संकेत, बावनकुळे म्हणाले….
प्रतीश बोले हा बांद्रा येथील ‘किरण एक्स्पोर्ट’ या डायमंड कंपनीत कार्यरत होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी राहून काम करणाऱ्या या तरुणाचा मृत्यू मोठा आघात ठरला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे घटना घडणारी ही पहिली घटना नाही. याआधीदेखील अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यावर आता प्रशासन काय उपाययोजना करणार? ते पाहणं महत्त्वाच आहे.
‘आम्हाला खडसेंचं चॅलेंज नाही, ते 2019 मध्येच संपले’, शिवसेनेच्या संजना पाटील यांचं वक्तव्य
दरम्यान, नालासोपारा–वसई मार्गावर दररोज प्रचंड गर्दी असल्यामुळे दरवाजात लटकून प्रवास करण्याची प्रवाशांची बाध्यता वाढली आहे. वाढत्या प्रवासीभाराचा विचार करून लोकल ट्रेनची संख्या वाढवावी आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
