Pune MLA Mercedes Car hits Girl : धडक इतकी तीव्र होती की मुलगी हवेत उडून काही अंतर दूर जाऊन रस्त्यावर आपटली.
कसा झाला अपघात?
शुभ्रा रस्ता ओलांडत असताना, वाघोलीवरून शिरूरकडे प्रचारासाठी येणारी काळ्या रंगाची मर्सिडीज (MH 12 1391) वेगाने पुढे आली आणि मुलीला जबर धडक बसल्याचे फुटेजमध्ये दिसते. धडक इतकी तीव्र होती की मुलगी हवेत उडून काही अंतर दूर जाऊन रस्त्यावर आपटली. या अपघातात तिचे दात तुटणे, जबड्याला गंभीर इजा आणि चेहऱ्यावर खोल जखमा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Solapur Accident : लग्नानंतर देवदर्शनाला जाताना सोलापुरात नवदाम्पत्याचा भीषण अपघात, कारचा चुराडा, पाच जणांचा जागीच मृत्यू
घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्परतेने मुलीला उचलून शिरूरमधील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याने तिला तातडीने पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. अपघाताची चर्चा शिरूरमध्ये वेगाने पसरल्यानंतरही पोलिसांनी सुरुवातीला कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे सांगितले. तसेच रुग्णालयाकडून माहिती मिळालेली नाही, आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही. अशा प्रतिक्रिया देत पोलिसांनी मौन बाळगल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, घटना दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे का? आमदारांच्या दबावाखाली माहिती लपवली जाते आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू असून, नागरिकांकडून पारदर्शक चौकशीची मागणी होत आहे.
Solapur News : अनगरमध्ये मोठा ट्विस्ट, राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित, उज्ज्वला थिटेंना दिलासा मिळणार?
सहलीच्या बसला रायगडमध्ये अपघात
रायगड किल्ला पाहण्यासाठी सांगलीतील इस्लामपूर येथील विकास कोचिंग क्लासच्या १६ विद्यार्थिनींना घेऊन आलेल्या बसला रविवारी नांदगावजळ अपघात होऊन सहा जण जखमी झाले. त्यात चार विद्यार्थिनी, एक शिक्षक आणि चालकाचा समावेश आहे. आदिती खैरमोडे, अक्षरा जाधव, अदिती खाडे, सिद्धी ठोकळे, शिक्षक जगन्नाथ येवले, योगेश (चालक) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
