Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकमध्ये झाडे तोडण्याच्या विरोधात आवाज उठवला आहे. २२० कोटींच्या निविदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सरकारवर टीका केली. झाडे आपली आई-वडील असून त्यांच्यावर हल्ला झाल्यास गप्प बसणार नाही, असे म्हणत त्यांनी नाशिककरांना पाठिंबा दर्शवला.
सयाजी शिंदेयांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, “साधू आले गेले मेले माहित नाही पण झाडे राहिली पाहिजे.” झाडांची व्याख्या अजून राज्य सरकारला माहीत नाही, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. “सगळ्यात जास्त वड आपल्या सरकारनेतोडले,” असा आरोपही त्यांनी केला. “झाडे आमची आई-बाप आमच्या आई बापावर हल्ला केला तर ही गप्प बसणार नाही,” असे म्हणत त्यांनी झाडांप्रति आपले प्रेम व्यक्त केले.
Raj Thackeray: नाशिकमध्ये सरकार झाडं तोडणार, राज ठाकरे भडकले; वेगळीच शंका व्यक्त करत म्हणाले…
गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले की, “गिरीश महाजन माझी तुमची दुश्मनी नाही आणि झाली तरी काही हरकत नाही.” “बारा वर्षांनी येतो त्याला काय म्हणतात,” असा प्रश्न त्यांनी विचारला. “जगात एकच सेलिब्रिटी झाड,” असे म्हणत त्यांनी झाडांचे महत्त्व अधोरेखित केले. “चांगली माणसं साधू संत असतात ते गर्दी करत नाही,” असे ते म्हणाले. “नाशिक कर चांगली माणसे आहेत,” असे कौतुकही त्यांनी केले.
दुर्दैवी! भलामोठा लोखंडी गेट अंगावर कोसळला; 5 वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत, वडिलांच्या कुशीत सोडला जीव
“हे झाडे तोडू नका मला केव्हापण बोलवा मी येईल,” असे आवाहन त्यांनी केले. “सगळे आपलेच शासन करते आहेत,” यावर त्यांनी भाष्य केले. “मी नाशिककरांना सपोर्ट करण्यासाठी आलो आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. “२२० कोटींचे हे टेंडर आहे,” यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. “आता इथे हा कसला मेळावा आहे,” असा प्रश्न त्यांनी विचारला. “इथे हिरव्या फुल्या मारल्या चेष्टा आहे का,” असे म्हणत त्यांनी प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
