Sindhudurg Accident News: दोन मित्र एकाच गाडीवरुन निघाले वाटेत त्यांना भीषण अपघात झाला आणि एकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबाला मोठाधक्का बसला आहे.
दोघे मित्र दुचाकीवरुन निघाले, वाटेत भीषण अपघात
देवगड-नांदगाव मार्गावरून मंदार माळवदे आणि त्याचा मित्र असे दोघेही दुचाकीवरून निघाले होते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. देवगड-नांदगाव मार्गावर तोरसोळे फाट्यानजीक गुरुवारी रात्री 7. 55 वाजताच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात मंदार माळवदे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र जखमी झाला आहे. ते शिरगाव बाजारपेठ येथील राहणारे होते. या घटनेने माळवदे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
Navi Mumbai Crime: 22 वर्षांच्या तरुणीने आयुष्य संपवलं; मित्राला पाठवलेल्या व्हॉईस नोटने धक्कादायक उलगडा, शेजारीणचा काय संबंध?
अपघात कसा झाला त्याबाबत सध्या काहीही माहिती नाही
मंदार माळवदे आणि तुषार जाधव हे दोघेजण दुचाकी (एमएच 07 एटी 1263) ने शिरगावहून वळीवंडेकडे जात असताना तोरसोळे फाट्यानजीक हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या अपघातात चालक मंदार माळवदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तुषार जाधव यांच्या उजव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. अजित ढवळे आणि डॉ. रुचा भांडवले यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच देवगड पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, महेंद्र महाडीक, प्रवीण तांबे, गणेश गावडे व नीलेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे. मंदार माळवदे हे लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या शिरगाव शाखेत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
