Raigad Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, रायगडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे.
घटनेनंतर आरोपी दरवाजाला कडी लावण्यासाठी गेल्यावर, पीडित मुलगी घाबरून बाहेर पळून गेली. आरोपीने मुलीला ‘कोणाला काही सांगू नकोस’, अशी धमकी दिली. ज्यामुळे मुलीला मानसिक त्रास आणि लज्जा उत्पन्न झाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता आणि संताप पसरला आहे. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात 138/2025 नोंदवत, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम, 2012 चे कलम 10, 12 आणि भारतीय दंडसंहिता 2023 चे कलम 74, 75 (1)(2), 76, 351, 126(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.
‘माझं राज्यात थोडं वजन कमी झालं’, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली खंत
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या शोषणाच्या प्रयत्नांना आम्ही शून्य सहिष्णुता धोरणाने सामोरे जातो. आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेनुसार कठोर शिक्षा मिळवून देण्यात येईल’, स्थानिक नागरिकांनी अशा घटनांवर प्रशासनाची तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी पालकांना मुलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. ही घटना पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेच्या गरजेची जाणीव करून देते. पोलीस तपास करत असून, आरोपीविरोधात सर्व पुरावे संकलित करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
Nirmala Gavit Accident : नातवाला फिरवत असताना अनर्थ, मागून येणाऱ्या कारनं उडवलं; माजी आमदार निर्मला गावितांचा भीषण अपघात; CCTV समोर
हिराबाई जोशी हत्याकांडाला वेगळं वळण
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मोठे भोम गावात 9 नोव्हेंबर रोजी घडलेली 90 वर्षीय हिराबाई जनार्दन जोशी यांच्या मृत्यूच्या गूढ घटनेत पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक वळण घेत आहे. सुरुवातीला ही नैसर्गिक मृत्यूची घटना मानली जात होती. मात्र, उरण पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांचा अभ्यास व प्राप्त पोस्टमार्टम अहवालाच्या आधारे हा मृत्यू बेदम मारहाणीचा परिणाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. हिराबाईंच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा आढळल्या तर त्यांच्या घरातून लाकडी पट्ट्या व दांडेही जप्त करण्यात आले, ज्यांचा वापर हल्ल्यात झाल्याचा निष्कर्ष तपासात निघाला.
