• Sun. Sep 20th, 2026

समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Nov 25, 2025
समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद




छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका): समाजप्रबोधन व राष्ट्राच्या उभारणीत संतांचे मोठे योगदान आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरुळ येथे केले.

संत जनार्दनस्वामी यांच्या वेरुळ येथील आश्रमात ॐ जगद्गुरू जनशांती धर्म या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. संत शांतीगिरी महाराज यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार. संजय केणेकर, आ. प्रशांत बंब, सुरेश चव्हाणके आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७५१ कुंड यज्ञशाळा प्रवेश सोहळा तसेच भगवान शिव मूर्तिचे पूजन व उदघाट्न करण्यात आले. संत नागेश्वरानंद आणि संत अवीमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संत शांतीगिरी महाराजांच्या अनुग्रहाने लाखो लोकांचे जीवन बदलले. देश प्रगतीपथावर नेण्याचे सामर्थ्य संतांच्या मार्गदर्शनात आहे.

 

०००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed