Gondia Mother Kills 20 Days Old Son: एका आईने आपल्याच 20 दिवसांच्या बाळाला नदीत फेकून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामागील जे कारण पुढे आलं ते अत्यंत धक्कादायक होतं.
याप्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या अधिक माहितीनुसार, सुरुवातीला महिलेने खोटी कहाणी रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तिने दावा केला की, 17 नोव्हेंबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने तिचे मूल चोरले आहे. या जबाबाच्याया आधारे, हरवलेल्या 20 दिवसांच्या बाळाचा शोध सुरू करण्यात आला. परंतु तपासादरम्यान, पोलिसांना तिच्या कहाणीवर संशय आला. पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि तिची कठोर चौकशी केली. तेव्हा तिने स्वत:च आपल्या मुलाला गोंदियाच्या वैनगंगा नदीत फेकून देत त्याची हत्या केल्याची कबुली दिली.
माझ्यासारखा त्रास कोणालाही नको, अखेरची इच्छा लिहित महाराष्ट्रातील विद्यार्थ्याने दिल्लीत आयुष्य संपवलं, शिक्षकांवर गंभीर आरोप
या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, महिलेला नोकरी करायची होती,तिला स्वतंत्रपणे तिचे जीवन जगायचे होते, परंतु त्याऐवजी तिला घरीच राहून तिच्या मुलाची काळजी घ्यावी लागली असती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला असं वाटू लागलं होतं की मूल झाल्याने ती घरातच मर्यादित राहील. या मानसिक दबावामुळे आणि परिस्थितीमुळे तिने हे अमानुष पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी महिलेने मुलाला वैनगंगा नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. शोध घेतल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. पोलिसांनी महिलेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या घटनेमागे इतर काही हेतू किंवा दबाव होता का याचाही तपास अधिकारी करत आहेत. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, एक आई इतके कठोर पाऊल कसे उचलू शकते यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये.

