• Tue. Aug 25th, 2026

Maharashtra Breaking News 18th November 2025: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

ByMH LIVE NEWS

Nov 18, 2025
Maharashtra Breaking News 18th November 2025: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

छत्रपती संभाजीनगर: शेतवस्तीत घुसून दरोडा,शेतकऱ्यांना कुऱ्हाड दांड्याने मारहाण, गंभीर जखमी, २ लाख ३१ हजारांचा ऐवज लंपास

पहाटेचे २ वाजेच्या सुमारास शेतवस्तीत घुसलेल्या ५ दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबावर हल्ला केला. चौघांना तब्बल दीड तास कुऱ्हाड व दांड्याने बेदम मारहाण केली. शेतकरी कुटुंबाच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कमसह एकूण २ लाख ३१ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथे असलेल्या तांदुळवाडी शिवारात घडली. या दरोड्यात जनार्दन कारभारी राशनकर, पत्नी हिराबाई राशनकर, सून मनिषा राशनकर हे गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed