Balasaheb Thackeray Smruti Din 2025: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील शक्तीस्थळावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल ११ वर्षांनी एकत्र आले. या भावनिक क्षणी संपूर्ण ठाकरे कुटुंब बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या 13 व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळावर राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू तब्बल 11 वर्षांनी एकत्र आलेले पाहायला मिळाले आहेत. हे चित्र पाहून शिवसैनिक आणि मनसैनिक भारावून गेले आहेत. कारण, गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू अनेकवेळा एकत्र आले आहेत.
Sharad Pawar: बिहारमध्ये सुपडा साफ, काँग्रेसचं भवितव्य काय? शरद पवारांचं मत चर्चेत
त्यांच्या युतीची चर्चाही रंगते आहे. पण, बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला या बंधूंनी स्मृतीस्थळावर एकत्र येणं ही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी एक वेगळी आणि तितकीच भावनिक करणारी गोष्ट ठरली आहे. यावेळी राज यांनी शेजारी बसलेल्या आदित्य यांच्याशी गप्पाही केल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर तब्बल 11 वर्षांनी एकत्र आले आहेत. यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील शक्तिस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंब बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आले आहे. तसंच याठिकाणी अभिवादनासाठी शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली आहे.
वरळी डोममध्ये पहिल्यांदा ठाकरे बंधू एकत्र आले होते. तेव्हा संपूर्ण ठाकरे कुटुंबही एकत्र दिसंल होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी मातोश्री या बाळासाहेबांच्या निवासस्थानी पोहोचत उद्धव यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर दिवाळीमध्येही ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र दिसलं होतं, निवडणूक आयोगाविरोधातला सत्याचा मोर्चाही ठाकरे बंधूंनी गाजवला होता. ठाकरे बंधूंनी अधिकृत युती आणखीनतरी जाहीर केलेली नाही. पण ठाकरेंच्या युतीची आता फक्त औपचारीकता शिल्लक आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
त्यामुळं आज बाळासाहेंबांच्या स्मृतीदिनाला शक्तीस्थळावर पोहोचलेले दोन्ही ठाकरे बंधू शिवसैनिक व मनसैनिकांना भावनिक करणारा क्षण ठरला आहे.

