• Sun. Jun 7th, 2026
    महाराष्ट्रातील ‘क्रिमिनल’ घटनांचे मास्टरमाइंड CM फडणवीसच; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

    Harshwardhan Sapkal: धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या प्रकरणावर पत्रकारांनी विचारले असता सपकाळ यांनी थेट फडणवीसांनाच लक्ष्य केले.

    sapkal vs fadnavis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: राज्यातील ‘क्रिमिनल ॲक्टिव्हिटी’चे मास्टरमाइंड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी बुलढाणा येथे केला.

    नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी बुलढाणा दौऱ्यावर सपकाळ आले होते. खरे तर फडणवीस हेच मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी आंतरवाली सराटी येथे अमानुष लाठीमार करायला लावला, तेव्हाच राज्याचे शांत, सभ्य व सौहार्द वातावरण बिघडले. मराठा-ओबीसी, व्हीजेएनटी- आदिवासी अशा जाती-जातींमध्ये, धर्मा-धर्मांत भांडणे लावण्याचे काम केले. कट रचणाऱ्यांची चौकशीच नाही, तर कारवाई झाली पाहिजे; अन्यथा पोलिसही उलटे काम करीत आहेत, हे सिद्ध होईल, असेही सपकाळ म्हणाले.
    Maharashtra TimesBuldhana Crime: मोबाईलमध्ये मुलींचे मेसेज, जाब विचारताच युवक कॉंग्रेस शहराध्यक्षाचा पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न, घटनेनं खळबळ
    अजित पवार यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा
    पार्थ पवार जमीन व्यवहारावरून पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी राजीनामा द्यायला हवा होता. भाजपमध्ये थोडी नैतिकता बाकी असेल, तर पवारांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ असे भाजप सातत्याने मांडते. आता मात्र ‘हम भी खायेंगे तुम भी खाओ’ यावर ते गेले आहेत. जमीन प्रकरणात संचालक मंडळावर, परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि ज्यांच्या इशाऱ्यावर हे काम झाले त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायला हवे, असेही सपकाळ म्हणाले.
    Maharashtra TimesBuldhana Accident : मुंबईतील बँकेत CA, 12 तारखेला होतं लग्न, घरी सर्व तयारी झालेली पण त्याआधी होत्याचं नव्हतं झालं, BKC मध्ये…
    शेतपत्रिका काढून दिवसभर चर्चा करा
    रकारने शेतपत्रिका काढून किती सरकारी जमिनी, वतनाच्या जमिनी लाटल्या, किती हस्तांतरित केल्या, किती खरेदी केल्या हे जाहीर करावे. भाजपचे कार्यालयही कोणत्या जागेवर आहे तेदेखील जाहीर करावे. श्वेतपत्रिका काढून दिवसभर चर्चा करावी अशी काँग्रेसची मागणी आहे, असे सपकाळ यांनी सांगितले

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा