Pune Leopard Attack : शेतकऱ्यांना आणि महिलांना त्यांच्या गळ्यात टोकदार खिळे असलेला पट्टा घालावा लागत आहे हे खरंच लाजिरवाणे आहे. त्यामुळे प्रशासन आणि वनविभागाचे अपयश समोर येतं.
शेती हेचं उपजीविकेचं साधन असल्याने, शेतात जाण्याविना या शेतकऱ्यांसमोर पर्याय नसतो. पण त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यातून जीव कसा वाचवायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. त्यावर पर्याय म्हणून जसं कुत्र्यांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे घातले जातात, तसे पट्टे घालण्याचा निर्णय या बळीराजाने घेतला आहे.
अजित पवारांनी मोठ्या राजकीय सस्पेन्सवर अखेर पडदा टाकला, नेमकं काय म्हणाले?
आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे बळीराजावर टोकदार खिळ्यांचे पट्टे परिधान करण्याची वेळ आली आहे आणि हे खरंच लाजिरवाण आहे. याबाबत बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, ‘कबूतरांच्या बाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक घेतली होती. पण इकडे बिबट्याने 57 बळी घेतल्यानंतर सरकारला जाग आली. आम्हाला त्यासाठी रास्तारोको कराव लागलं. आमची मागणी आहे की बिबट्याचा हल्ला हा राज्य आपत्ती घोषित करावा. तसे जर केरळ सरकार घोषित करत असेल मग आपल्या मुख्यमंत्र्यांना काय अडचण आहे?’
Jalna Crime : दोघांच्या प्रेमाची अख्ख्या गावाला कुणकुण, भांडणी झाल्यानं तणावात, डोंगरात गेले, काहीवेळ सोबत घालवला अन्…
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्या ला ठार करण्यात वन विभागाला यश आलं आहे. रात्री उशिरा गावामध्ये बिबट्याचा शोध घेत असताना वन विभागाला हा बिबट्या ड्रोनमध्ये दिसला. यामुळे सावध झालेल्या बिबट्याने थेट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरती प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी दोन शार्प शूटरने या बिबट्यावर तीन राऊंड फायर केले, यात बिबट्या ठार झाला. 6 वर्ष वयाचा नर जातीचा हा नरभक्षक बिबट्या आहे. 13 वर्षीय रोहनचा जीव ज्या ठिकाणी घेतला तिथून 400 मीटर अंतरावर या बिबट्याला ठार करण्यात आलं.

