Raigad Accident News : रायगड जिल्ह्यातील नागोठणेमध्ये एक भीषण अपघात झाला. या अपघातात 72 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. बसने कट मारल्याने दुचाकीचं संतुलन बिघडलं आणि ते खाली पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम दामा गायकवाड (वय 72, रा. चंदनवाडी, ठाणे) हे एम.एच. 06 सी.ए. 4149 या क्रमांकाच्या मोटारसायकलवर मागे बसून नागोठणेकडे येत होते. दरम्यान, नागोठणेहून रिलायन्स चौकाच्या दिशेने जाणारी पाली-पेण एस.टी. बस क्र. एम.एच. 20 बी.एल. 3239 कोळीवाड्याजवळील सलीम मटन दुकानासमोर आली असता बसचालकाने मोटारसायकलच्या अगदी जवळून कट घेतल्यानं बाईकचं संतुलन बिघडलं आणि गायकवाड खाली पडले.
Mumbai Local : रेल्वे कर्मचाऱ्यांनी मुंबईची लोकल थांबवली, मध्य रेल्वेची वाहतूक 50 मिनिटं थांबली, अखेर…
या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी तात्काळ त्यांना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं, मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केलं. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिकांनी बसचालकाच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश रूईकर पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या मार्गावर एस.टी. बसचालकांकडून अनेकदा वेग आणि बेदरकार ड्रायव्हिंगबाबत स्थानिकांनी तक्रारी केल्या आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रशासन आणि परिवहन विभागाने बसचालकांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नागोठणे-पाली मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे स्थानिकांनी नमूद केलं आहे.
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना मारण्यासाठी किती कोटींची सुपारी? बीडमधील ‘त्या’ नेत्याचा प्लॅन, एक आरोपी जरांगेंचा निकटवर्तीय
आरोपी विवाहित प्रियकराची रेल्वेतून उडी
मध्य रेल्वेच्या बदलापूर-वांगणी स्थानकाजवळ तेलंगणा राज्यातील एका आरोपीने धावत्या ट्रेनमधून उडी घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली. सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. मृत आरोपीचं नाव प्रकाश राय (वय 30) असून तो तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात होता, अशी माहिती आहे.

