स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांनी किती पैसे खर्च करायचे याबाबत मर्यादा आखून देण्यात आल्या आहेत. त्यापेक्षा जास्त पैसे खर्च झाल्याचं निदर्शनास आल्यास आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाची आज अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये येत्या 2 डिसेंबरला मतदान होईल. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीत 86,859 सदस्यांची निवड होणार आहे. तसेच 288 अध्यक्षांची देखील निवड होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली. यावेळी निवडणूक आयुक्तांनी प्रत्येक वर्गाच्या सदस्यांसाठी किती खर्च मर्यादा असेल याबाबत सविस्तर विश्लेषण केलं.
अ वर्गातील नगर परिषदेच्या निवडणुकीत किती खर्च करता येणार?
अ वर्गातील नगर परिषदांच्या निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे. सदस्य पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी 5 लाख रुपयांची मदत आखून दिली आहे. तर अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्यांना 15 लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे.
ब वर्गातील नगर परिषदांसाठीच्या उमेदवारांना किती खर्चाची मर्यादा?
ब वर्गाच्या नगर परिषदांमध्ये निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना अ वर्गापेक्षा कमी खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. ब वर्गाच्या नगर परिषदांसाठी सदस्य पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला खर्चासाठी 3 लाख 50 हजार रुपयांची मर्यादा आखून देण्यात आली आहे. तर अध्यक्ष पदाच्या उमेदवारांना 11 लाख 25 हजार रुपयांची मर्यादा आखून देण्यात आली आहे. मतदारयाद्यांमधील घोळ ते EVM, निवडणूक आयुक्तांना पत्रकारांच्या प्रश्नांनी घेरलं, दिनेश वाघमारेंनी काय-काय उत्तरे दिली?
क वर्गातील नगर परिषदांसाठी काय?
क वर्गाच्या नगर परिषदांसाठी देखील खर्य मर्यादा जाहीर करण्यात आली. क वर्गाच्या नगर परिषदांमध्ये अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना 7 लाख 50 हजार रुपयांची मर्यादा जाहीर करण्यात आली आहे. तसेच सदस्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदारांना 2 लाख 50 हजार रुपयांची खर्च मर्यादा सांगण्यात आली आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी, वाचा संपूर्ण कार्यक्रम
नगर पंचायतींसाठी किती खर्चांची मर्यादा?
नगर पंचायतींच्या अध्यक्ष आणि सदस्य पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी देखील खर्च मर्यादा जाहीर करण्यात आली आहे. नगरपंचायतींच्या अध्यक्ष पदासाठी 6 लाखांची खर्च मर्यादा जाहीर करण्यात आलीय. तर सदस्य पदासाठी 2 लाख 25 हजार इतकी खर्च मर्यादा आखली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा