• Tue. Sep 22nd, 2026

क्रिकेट विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचे मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Nov 4, 2025
क्रिकेट विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचे मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन – महासंवाद




मुंबई, दि. ४: – आयसीसी महिला विश्वचषकावर पहिल्यांदाच भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. याबाबतच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संघाच्या या घवघवीत यशाबाबत गौरवोद्गार काढले.

भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधाना, जेमिमा रॉड्रीग्ज, आणि राधा यादव यांना या ऐतिहासिक विजयातील भागीदारीसाठी रोख पारितोषिकाने गौरवान्वित करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला.

०००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed