Ahilyanagar News : अहिल्यानगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी नगरसेवकाने एका महिलेवर नऊ वर्षे अत्याचार केला. जबरदस्तीने शरीर संबंध ठेवत तिची फसवणूक करत राहिला. पत्नीला समजल्यावर तिने त्यापेक्षाही पुढचं पाऊस उचललं, नेमकं काय केलं? जाणून घ्या.
तुझाशी लग्न करीन असे सांगून अत्याचार
पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार व्हेंबर २०१६ ते १९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपी सुनील वाळके याने लग्न करीन असे सांगून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले. अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील सारंगी हॉटेल अँड लॉजिंग, हॉटेल अशोक, तसेच पीडितेच्या राहत्या घरातही आरोपीने बळजबरीने शरीर संबंध ठेवले.
हात बांधले, छातीवर पाय ठेवला, गतिमंद चिमुकल्या विद्यार्थ्याला कुकरच्या झाकणाने मारहाण; केअर टेकर्स अन् शिपायाचं राक्षसी कृत्य
खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
दरम्यान, आरोपीने पीडितेसोबत काढलेले खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार सुरूच ठेवले. इतकेच नव्हे, तर सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करताच आरोपीने तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असेही फिर्यादीत नमूद आहे. या प्रकाराची माहिती पीडितेने आरोपीच्या पत्नीला मनीषा वाळके दिली असता, तिने पीडितेला हात-पाय तोडून फेकून देईनअशी धमकी दिली. अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला.
तरुणीला कॉलेजमध्ये गाठलं, गप्पा मारताना अचानक कारमध्ये बसवलं अन् लॉजवर नेलं; ती धमकी देत…, घटनेनं खळबळ
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणी सुनील वाळके व मनीषा वाळके या दाम्पत्याविरुद्ध बलात्कार, धमकी, दमदाटी आणि शिवीगाळ यांसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, श्रीगोंदा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

