Ladki Bahin Yojana October Installment : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. याच पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.
आदिती तटकरे ‘एक्स’वर काय म्हणाल्या?
आदिती तटकरे यांनी ‘एक्स’वर याबाबत माहिती दिली आहे. त्यात त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती!’ असं म्हटलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया
E-KYC कधी पर्यंत करायचं?
दरम्यान, लाडकी बहिण योजनेसाठी E-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पण मधल्या काळात E-KYC करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. E-KYC करताना OTP येत नसल्याचं उघड झालं होतं. अनेक महिलांनी याबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर आदिती तटकरे यांनी याची दखल घेतली. तांत्रिक अडचणी दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर करण्यात आली आहे. आता 19 नोव्हेंबरपर्यंत E-KYC करणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.

