• Sun. Mar 15th, 2026
    शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून नंतरच का? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

    प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं. यानंतर अजित पवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, बारामती : शेतकऱ्यांच्या महाएल्गार मोर्चानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यासाठी 30 जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे. यावरून वेगवेगळ्या स्थरातून सरकारवर टीका होऊ लागली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी 30 जूननंतर का? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ नंतर शेतकऱ्यांना संबोधित करताना महत्त्वाची भूमिका मांडली.

    “राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी 30 जून नंतर होणार आहे. कारण यंदाच्या वर्षी सरकारवर मोठा आर्थिक भार पडलेला आहे. पण जाहीरनाम्यात शब्द दिल्याने सरकारने तो निर्णय घेतला आहे. परंतु हे सारखं सारखं होणार नाही”, असं सांगायला अजितदादा विसरले नाहीत. “वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बँका शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करतात. शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त लावली पाहिजे. यात आम्हाला राजकारण करायचं नाही”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

    कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून ३० जुन रोजी कर्जमाफी होईल, असे मत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. “अतिवृष्टी, दुष्काळ पुरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे शेतमाल व फळबागांचे नुकसान झाले आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ३२ हजार कोटी रुपयांची मदत केली असून ती शेतकऱ्यांचा खात्यात जमा होणार आहे”, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
    Maharashtra Timesमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडण्याचे संकेत, उद्याच्या मोर्चानंतर ठाकरे बंधूंची मोठी रणनीती
    “कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी शासनाने चर्चा केली आहे. शासनाने कर्जमाफीसाठी कमिटी स्थापन केली असून त्यांनी दिलेल्या अहवालानुसार कर्जमाफी केली जाईल याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना होईल. शेतकऱ्यांनी आपल्या हितासाठी आंदोलन केले असून ज्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या बाबतीत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील”, अशीदेखील प्रतिक्रिया कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा