• Sun. Mar 8th, 2026
    Pune News : 23 स्थानकं, 23.3 किमी लांब मार्ग कसा असेल? माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा विस्तार, राज्य सरकारचे आदेश

    Pune MEtro News : पुणे मेट्रोचा माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा विस्तार महामेट्रो करणार असून या मेट्रोचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. या मार्गावर 23 स्थानकं असतील आणि 23 किमी लांब ही मार्गिका अखेरच्या स्थानकापर्यंत सुरू करण्यात येईल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    पुणे : पीएमआरडीए अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो मार्गिकेचा विस्तार केला जाणार आहे. मेट्रोच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेचा विस्तार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थात महामेट्रो हा विस्तार करणार आहे. राज्य सरकारने या विस्ताराबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या या मेट्रो प्रकल्पाचं सुरू असलेलं काम पूर्ण करण्याएवढीच ‘पीएमआरडीए’ची जबाबदारी राहणार आहे.

    मेट्रो मार्गिकेचा विस्तार

    राज्य सरकारने उर्वरित महाराष्ट्रातील मेट्रोचा विस्तार करण्याची जबाबदारी ही महामेट्रोकडे दिली आहे, तर मुंबईतील विस्ताराची जबाबदारी ‘एमएमआरडीए’कडे देण्यात आली आहे. त्यामुळे माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेचा विस्तार महामेट्रोकडून केला जाईल, अशी माहिती पीएमआरडीए, महानगर आयुक्त, डॉ. योगेश म्हसे यांनी दिली आहे.
    Maharashtra TimesPune News : पुण्यात 500 किमी अंतराचे रस्ते खोदणार, कारण काय? पादचारी, वाहनचालकांना मोठा त्रास

    23.3 किमी लांबीचा मार्ग, 23 स्थानकं

    ‘पीएमआरडीए’कडून मेट्रो प्रकल्प टाटा-सिमेन्स कंपनीसोबत सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) राबवण्यात येत आहे. या 23.3 किलोमीटर लांबीच्या मार्गात 23 स्थानकं आहेत. मेट्रोची एकूण प्रवासी संख्या, मेट्रोची क्षमता सुमारे 1 हजार असणार आहे. सध्या या प्रकल्पाचं जवळपास 90 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झालं असून, इतर काम शेवटच्या, अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या वर्षीच्या पहिल्या त्रिमाहीमध्ये ही मेट्रो धावणार असल्याचा अंदाज आहे.
    Maharashtra TimesPune News : मुठा नदीच्या दोन्ही बाजूंना तयार होतोय सेवा रस्ता, महामार्गावरील कोंडी होणार कमी; कुठून-कसा असेल मार्ग?

    माण-हिंजवडीपासून शिवाजीनगर या एकाच टप्प्यात मेट्रो

    चालू वर्षी जुलै महिन्यात या मेट्रोची माण डेपो ते पीएमआर-चार स्थानकापर्यंत पहिली चाचणी घेण्यात आली. या मेट्रोचे काम पूर्ण होऊन ती धावण्यास मार्च 2026 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही मेट्रो ‘पीपीपी’ तत्त्वावरील असल्याने एकाच टप्प्यात माण-हिंजवडीपासून शिवाजीनगर या अखेरच्या स्थानकापर्यंत सुरू करण्यात येणार आहे.

    राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर मेट्रोनं प्रवास करण्याची वेळ, पाटलांना वाहतूक कोंडीचा फटका

    मेट्रो विस्तारीकरणाची जबाबदारी महामेट्रोची

    या मेट्रो मार्गिका तीनचं विस्तारीकरण करणं आवश्यक होतं. त्यासाठी ‘पीएमआरडीए’कडून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, मेट्रो विस्तारीकरणाची जबाबदारी राज्य सरकारने महामेट्रोकडे दिली आहे. त्यामुळे विद्यमान प्रकल्प पूर्ण केल्यानंतर ‘पीएमआरडीए’ची जबाबदारी संपणार आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा