Nagpur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. पैशांच्या वादावरुन एका जणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितेश सिरसाम हा काही दिवसांपूर्वी आपल्या मित्रासोबत बाहेर गेला होता. त्यांच्या गाडीतील इंधन संपल्याने ते कामठी येथील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत होते. त्याचवेळी हल्लेखोर आशीष मेंढे अचानक हातात चाकू घेऊन त्या ठिकाणी आला आणि नितेशकडे धाव घेत त्याच्यावर वार करू लागला. काही कळायच्या आत आशीषने नितेशच्या गळ्यावर आणि पाठीवर चाकूने जबर वार केले.
दिल्लीवरुन ‘तो’ कॉल अन् CM पद गेलं; आता ‘दुसरे’ एकनाथ रडारवर? फडणवीसांनी दिलेला मेसेज चर्चेत
उपचारादरम्यान मृत्यू
या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळ उडाला. हल्ल्यानंतर नितेशने जखमी अवस्थेतच हल्लेखोराला प्रतिकार केला. मात्र, रक्तस्राव जास्त झाल्याने तो खाली कोसळला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ नितेशला कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Buldhana Crime : नवरा-बायकोचं प्रवासात भांडण, पत्नी अर्ध्या रस्त्यातून माहेरी, पतीने पोटच्या लेकींना संपवलं; महाराष्ट्र हादरला
वादाचं रूपांतर रक्तरंजित घटनेत
नितेश आणि आशीष यांच्यात काही दिवसांपूर्वी 10 हजार रुपयांच्या उधारीवरून वाद झाला होता. नितेशने आशिषकडून ही रक्कम उसने म्हणून घेतली होती. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अखेर या वादाचं रूपांतर रक्तरंजित घटनेत झालं. याप्रकरणी नितेशची पत्नी अंजली सिरसाम यांनी कामठी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आशीष मेंढे याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी हल्ल्यात वापरलेला सुरा जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. या हल्ल्याने कामठी परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, पेट्रोल पंपावर झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

