Nagpur Murder News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, नागपुरात एका युवकाची उधारीच्या पैशांमुळे हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीतेश याचा गोयल टॉकीज परिसरात पानीपुरीचा ठेला आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याने एका महिलेच्या माध्यमातून आशिष याच्याकडून 10 हजार रुपये उधार घेतले. नीतेश हा आशिष याला दर महिन्याला थोडी-थोडी रक्कम परत करायचा. काही महिन्यांपासून व्यवसाय मंदावल्यानं तो आशिष याला पैसे देऊ शकला नाही. 12 ऑक्टोबरला आशिष हा चार साथीदारांसह नीतेशच्या घरी आला. त्याने त्याच्याकडून पैसे व दुचाकी वाहन मागितलं. नीतेशने गयावया करीत लवकरच पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नीतेशला धमकी देत आशिष हा साथीदारांसह तेथून परत गेला.
Maharashtra Weather: राज्यात पुढील तीन दिवस पावसाची हजेरी; मुंबई, पुण्यासह सात जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट
सायंकाळी नितेश हा दुचाकी वाहनात पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेला. येथे मेंढे याने नीतेशवर चाकूने हल्ला केला व पसार झाला. नीतेश याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गुरूवारी नीतेश याचा मृत्यू झाला. नातेवाइक व परिसरातील नागरिक आशिषचा मृतदेह घेऊन थेट जुनी कामठी पोलिस स्टेशनमध्ये धडकले. आशिषविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी त्यांना ठोस कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर तणाव निवळला. आशिषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य: ‘शहरी नक्षलवाद हे नव्या युगातील सर्वात मोठं आव्हान, तर काँग्रेस अल्ट्रा लेफ्टिस्ट विचारांनी ग्रस्त’
बेदम मारहाण करत तरुणाला संपवलं
दिवाळी पाडव्याच्या दिवशी वाशिम जिल्ह्यातील आमखेड गावात गैरकायद्याची मंडळी जमवून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. ‘पोलीस ठाण्यात छेडछाडीची तक्रार का दिली?’ म्हणत दोन गटात झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी फुलायंती नेमीचंद चव्हाण (वय 52) यांनी जऊळका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून फुलायंती यांच्या सवतीची मुलगी रंगीलानं छेडछाडीची तक्रार पोलिसांत का दिली? या कारणावरून आरोपी दादाराव पवार याने त्याच्या साथीदारांच्या मदतीनं जीव घेण्याच्या उद्देशाने चाकू आणि दगडाने मारहाण केली. यात फिर्यादी फुलायंती हिचा मुलगा अविनाश हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला तर पती, दुसरा मुलगा आणि सून गंभीर जखमी झाले.

