Former MLA Rajiv Deshmukh Passes Away : चाळीसगाव तालुका विधानसभेचे तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजीव देशमुख हे गेल्या अनेक वर्षापासून चाळीसगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होते. अतिशय शांत स्वभाव संयमी म्हणून त्यांची ओळख चाळीसगाव तालुक्यात होती. त्यांना आज सकाळीच अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि चाळीसगाव तालुक्यातील एक लोकप्रिय प्रतिनिधी म्हणून ओळख असलेला नेता आज चाळीसगाव तालुका त्यातून हरपला आहे.
चुकीच्या दिशेने भरधाव टेम्पो आला अन्… मोठा अनर्थ, दिवाळीची भाऊबीज अधुरीच… कोल्हापूर हळहळलं
राजीव देशमुख यांनी आपली राजकीय सुरुवात चाळीसगावच्या नगरपालिका निवडणुकपासून सुरू केली होती. त्यात चाळीसगावच्या नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी या विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर 2009च्या निवडणुकीमध्ये राजीव देशमुख हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांचा सलग दोनवेळा पराभव झाला. तरीही गेल्या वर्षाच्या निवडणुकीत त्यांना देखील तिकिटासाठी पक्षाकडून आग्रह धरला जात होता. मात्र, त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी न घेता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेश पाटील यांना साथ दिली होती.
सोलापूरमध्ये राष्ट्रवादीत मोठं संकट, डॅमेज कंट्रोलसाठी अजित दादांचा खास माणूस मैदानात, जोरदार हालचाली
अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती देखील ठीक नव्हती, त्यामुळे त्यांनी विधानसभेची उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे उमेदवारी ही उन्मेश पाटील शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आली. मात्र, आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं एका खासगी दवाखान्यामध्ये दाखल केलं. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणजोत मालवली. संपूर्ण चाळीसगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शांत, संयमी आणि सभ्य म्हणून राजीव देशमुख यांची चाळीसगाव तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज संध्याकाळी चाळीसगाव येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.

