वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी रणजीत कासले यास गुजरात पोलिसांची अटक
बीड जिल्ह्यातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले यास गुजरात पोलिसांनी लातूरमधून ताब्यात घेतले. सुरत परिसरातील जबरी घरफोडी प्रकरणातील आरोपींकडून कासले यांचे नाव समोर आल्यानंतर गुजरात पोलिसांनी दोन दिवस शोध मोहीम राबवली होती. एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने कासले यास अटक करून गुजरातला रवाना करण्यात आले. कासले यांच्यावर आधीच सात गुन्हे दाखल असून हा आठवा गुन्हा ठरला आहे. बडतर्फीनंतर त्यांनी सोशल मीडियावरून अनेक नेते आणि अधिकाऱ्यांवर आरोप केले हो
