Thane News : दिव्यामध्ये बॅनर लावत भाजपने अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला डिवचलं आहे. दिवा शहरातील भाजपने लावलेल्या बॅनरची चर्चा होऊ लागली आहे. नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपचा रोख आहे.
बॅनरवर कोणता आशय?
दिव्यात 4 वर्षापूर्वी ऐन दिवाळीत विकासाच्या नावाखाली सामान्य दिवेकरांच्या इमारती पाडून त्यांना बेघर करत पडले गाव येथे स्थलांतरीत करण्यात आलं. मात्र, त्यांच्या समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे भाजपने ‘आली दिवाळी पण, आठणीत आहे…दिवेकरांना 4 वर्षापूर्वीची काळी दिवाळी’, अशा आशयाचं बॅनर लावले आहेत. याच बॅनरवर विकासाचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर विकासकांनी नागरिकांची घरे तोडली. त्यांना बेघर केलं आणि 50 रुपयांच्या हप्त्यांसाठी फेरीवाले बसविले. एका संस्थेने तिथे सार्वजनिक शौचालय उभारलं. हाच का तो कार्यसम्राटांचा विकास? असं काम करुन दिव्याचा विकास होणार आहे का? ही घरे फेरीवाले बसविण्यासाठी तोडली होती का? असा प्रश्नही या बँनरमधून विचारण्यात आला असून अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला डिवचलं आहे.
Mumbai News: मुंबईतील रेल्वे स्थानकावर जन्म घेतलेल्या बाळाबाबत मोठी अपडेट; प्रकृती चिंताजनक, कारणही आलं समोर
पुढे आवाहन करताना म्हटलं आहे की, ‘आता वेळ आली आहे या कार्यसम्राटांना फाटकी शाल व नासलेलं श्रीफळ देवून घरी बसविण्याची’, ‘मतदान बदला, दिवा नक्कीच बदलेल’. ‘आता बस्स झाले, ज्यांच्यावर तुम्ही कार्यसम्राट म्हणून विश्वास ठेवला त्यांनी तुम्हाला बेघर केलं आहे. स्थलांतरित केलं आहे. त्यांच्यामुळे तुमच्यावर आज काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आहे. त्यामुळे एकदा मतदान बदलून पहा, तरच तुमचे चांगले दिवस येणार आहेत’, असा संदेश दिवेकरांना देण्यात आला.
पुण्यात शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप, परिसरात सध्या तणावाचं वातावरण, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
ऐन दिवाळीच्या तोंडावर घरात फराळ
याबाबत भाजप दिवा शहर मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी सांगितलं की, ‘आज ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत. याच ठिकाणी 4 वर्षापूर्वी काही लोकांची घरे होती. ऐन दिवाळीच्या तोंडावर घरात फराळ बनत असताना त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवला गोला, त्यांना बेघर केलं गेलं. विकासाच्या नावाखाली त्यांना बेघर केलं आहे. 4 वर्षानंतर इथे परिस्थिती पहाल तर जशी घर तोडली तशीच जमीन येथे आहे. जो आरओबी बनवायला घेतला होता, तो अर्धवट अवस्थेत पडलेला आहे. येथील स्वयंघोषित कार्यसम्राट आहेत त्यांनी विकासाच्या नावावर घरं उध्वस्त केली. अशा लोकांनी या रस्त्यावर फेरीवाले बसवलेले आहेत आणि काही लोक त्यांच्याकडून 50 रुपये हप्ता गोळा करतात. एका संस्थेच्या नावाने जिथे इमारती तोडल्या त्याठिकाणी सार्वजनिक शौचालय उभे केले, तर हाच होता का त्यांचा विकास?’ असा प्रश्न समस्त दिवेकरांना पडला आहे.

