Special agent francis: मुंबईतील फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीसह १६ जणांना बंगळुरूमध्ये अटक करण्यात आली आहे. ही टोळी अमेरिकन आणि कॅनेडियन नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवून लाखो रुपये लुबाडत होती.
या टोळीने अमेरिकन आणि कॅनेडियन नागरिकांचे डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लाखो रुपये लुबाडले. आरोपी स्वतःला अमेरिकन ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन (DEA), यूएस पोस्टल सर्व्हिस इन्व्हेस्टिगेशन सेक्शन आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI)चे अधिकारी म्हणून सादर करत. फ्रान्सिससह सर्व आरोपींना तीन आठवड्यांचं प्रशिक्षण देऊन अमेरिकन उच्चारात बोलण्याचे, चौकशीसारखा सूर आणण्याचे आणि खोट्या कायदेशीर धमक्या देण्याचे शिक्षण देण्यात आले होते.
धक्कादायक! शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर महिलेचे गंभीर आरोप; न्याय मिळत नसल्याने महिला आयोगाकडे धावया रॅकेटचे कामकाज बंगळुरूतील एका बंगल्यातून सुरू होत होते. आरोपींना या ठिकाणी दरमहा २२ हजार रुपयांचा पगार, राहण्यासाठी आणि जेवणासाठी मोफत सोय, तसेच बाहेर जाण्यावर बंदी ठेवण्यात आली होती. प्रत्येक कर्मचाऱ्यावर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जात होते. पोलिसांनी सांगितले की, हे ठिकाण एका वृद्ध जोडप्याच्या नावावर आहे, परंतु त्या जोडप्यालाही या कामाबाबत काहीच माहिती नव्हती.
फ्रान्सिस आणि त्याचे साथीदार अमेरिकन नागरिकांना फोन करून सांगायचे की, त्यांच्या नावावर अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकरण दाखल आहे. त्यानंतर “तुमचा डिजिटल अरेस्ट झाला आहे” असे सांगून त्यांच्या भीतीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर पैसे ट्रान्सफर करून घेतले जात. काही केसेसमध्ये तर पीडितांकडून हजारो डॉलर वसूल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, या आरोपींपैकी अनेकजण १०वी किंवा १२वी नापास आहेत, पण इंग्रजी बोलण्याच्या क्षमतेमुळे त्यांना नोकरी देण्यात आली. या टोळीचे कनेक्शन थायलंड, फिलिपीन्स आणि अमेरिकेतील फसवणूक नेटवर्कशी असल्याची शक्यता तपासात समोर आली आहे.
वाचाळवीरांना आवरा, संग्राम जगतापांच्या विधानावर संताप, सुप्रिया सुळे थेट बोलल्या
पोलिसांनी या प्रकरणाला “डिजिटल ह्युमन ट्रॅफिकिंग आणि फसवणूक सिंडिकेट” असे संबोधले असून, भारतातूनच विदेशातील नागरिकांना फसवणाऱ्या या प्रकाराने सायबर गुन्हेगारीचे नवे रूप समोर आणले आहे.

