Buldhana Crime News : बुलढाण्यातली मलकापूरमध्ये एक संतापजनक तसेच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचं अपहरण करत असलेल्या आरोपींना नागरिकांनी चांगलंच चोपलं आहे. नागरिकांनी तब्बल 28 किलोमीटरपर्यंत या आरोपींचा पाठलाग केला आहे.
सय्यद शाकेर सय्यद वहाब (वय 20), इमरान शिकल्लोद्दीन सिद्दिकी (वय 20) व उबेद अहमद उल्ला पठाण (वय 19) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, तिघेही बीड जिल्ह्यातील माजलगावचे रहिवासी आहेत. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137 (2), 3 (5), 74, सहकलम 8, 12 पोक्सोंतर्गत गुन्हे दाखल केले.
Sangli Crime : सांगलीत सर्वात मोठी कारवाई! 1 कोटीच्या बनावट नोटा जप्त, रात्री गस्तीवर असताना पोलिसांना संशय, धाड टाकताच…
मलकापुरातील छोटा बाजारातील रहिवासी असलेली विद्यार्थिनी मैत्रिणीसोबत शाळेत जात होती. सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास एमएच 01 एपी 7839 क्रमांकाच्या कारमधून उतरलेल्या तिघांनी मुलीस वाहनात कोंबलं. ही घटना काही लोकांनी पाहताच कारचा दुचाकींनी पाठलाग सुरू केला. तसेच काहींनी बोराखेडी पोलिसांना सांगितलं. बोराखेडी पोलिसांनी नाकाबंदी केली. मोताळा फाट्याजवळ अडविण्यासाठी लावलेल्या गाड्या उडवून आरोपी पसार झाले. त्याचवेळी पोलिसांनी पाठलाग सुरू केला. पोलिस आणि नागरिकांनी सतर्कता बाळगल्याने आरोपींचा मुलीच्या अपहरणाचा कट उधळला गेला.
गुन्हा मलकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पोलिस बंदोबस्तात आरोपींना मलकापूरला नेण्यात आलं. तत्पूर्वी बोराखेडी पोलिस ठाण्यासमोर तसेच बेशुद्ध पडलेल्या मुलीस उपचारासाठी नेलेल्या मोताळ्यातील रुग्णालयासमोरही शेकडोंचा जमाव जमला होता. अतिरिक्त पोलिस कुमक बोलवावी लागली. तर बोराखेडी पोलिस ठाण्याचे गेटही पोलिसांना बंद करावे लागले होते.
Nagpur Crime : मुलगा अन् सून मुंबईला फिरायला, इकडे आईसोबत भयानक घडलं; परत आल्यावर लेकानं घराचा दरवाजा उघडताच…
टायर फुटल्याने अडकले आरोपी
आरोपींनी वाहन कच्च्या रस्त्याने टाकल्याने टायर फुटले. जीव वाचवत आरोपी शेतात पळत असतानाच नागरिकांनी पकडून चांगलेच बदडले. जमाव आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी आरोपींची सुटका करीत बोराखेडी पोलिस ठाण्यात नेले. आरोपींना चोप देतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे.

