महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणाची नांदी होण्याची शक्यता आहे. कारण ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात मनोमिलन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिथे नुकसान होऊ शकतं तिथे भाजप वेगळी रणनीती आखत आहे. साताऱ्यात फलटणमध्ये असंच काहीसं घडत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण फलटणच्या राजकारणात सध्याच्या घडीला पडद्यामागे मोठ्या हालचाली घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात मनोमिलन होणार असल्याच्या चर्चांना प्रचंड वेग आला आहे. संबंधित चर्चा समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण राजकारणात काहीही घडू शकतं. हे एकदम सत्य आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील वाद सर्वश्रूत असाच आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काय-काय घडामोडी घडल्या ते सर्वश्रूत आहे. रामराजे आणि रणजितसिंह यांच्यात जुना वाद आहे. पण त्यांच्यात आता मनोमिलन होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
ही चर्चा खरी ठरली तर राजकारणात कुणीही परस्परांचं कायमचं शत्रू नसतं हे खरं होताना दिसणार आहे. रामराजे निंबाळकर यांनी याबाबत स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तरच मनोमिल होईल, असं सूचक वक्तव्य रामराजे निंबाळकर यांनी केलं आहे.
रामराजे नेमकं काय म्हणाले?
“ते काय म्हणाले, विकासाच्या कामात मध्ये येऊ नका. आम्ही येतोय मध्ये? उलट आम्ही केलेल्या कामात यांचं काय-काय झालं ते बोलेन. फक्त निवडणुका लागू द्या. मनोमिलन हा प्रश्न एकट्याचा नसून एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. सत्तेचं राजकारण करायचं असेल तर विचार होणार नाही. वरिष्ठांनी सांगितलं तर होईल. नाहीतर होणार नाही”, असं रामराजे निंबाळकर म्हणाले आहेत. रामराजे निंबाळकर यांच्या वक्तव्यानंतर आता रणजितसिंह नाईक निंबाळकर काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा