Navi Mumbai Police: नवी मुंबईत स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सीबीडी बेलापूर येथील महिलांची सुटका केली. यामध्ये थायलंड, नेपाळ आणि विविध राज्यांतील महिलांचा समावेश आहे. स्पा मालक व कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त भलिंद्र भारंबे यांनी अनैतिक व्यापार आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त माहिती मिळाली की, सीबीडी बेलापूर सेक्टर 15 येथील “मॅजिक मोमेंट वेलनेस स्पा” या स्पा सेंटरमध्ये सहा हजार रुपयांच्या मोबदल्यात महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे.
Pune News: पुण्यात हॉस्टेलमध्येच परिचारिकेने आयुष्य संपवलं, प्रियकरावर गुन्हा दाखल, कारण काय?
पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या या माहिती खातरजमा करण्यात आल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक स्पामध्ये पाठवला. या ग्राहकाने दिलेल्या माहितीच्या आधारे शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांना स्पा सेंटरमध्ये 15 महिला आढळून आल्या. यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाले की स्पा सेंटरचा मालक आणि सफाई कामगार या महिलांना मसाजच्या नावाखाली आणत असत आणि वेश्याव्यवसायासाठी भाग पाडत होते.
पोलिसांकडून या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये 2 महिला थायलंडमधील असून 1 नेपाळची, 2 दिल्लीतील, 2 उत्तर प्रदेशातील, 1 पश्चिम बंगालची, 1 गुजरातची आणि 6 महाराष्ट्रातील महिलांचा यामध्ये समावेश आहेत.
दरम्यान, दोन्ही आरोपींविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सीबीडी पोलिसांकडून केला जात आहे.

