Bala Nandgaonkar on Omraje Nimbalkar : सध्याच्या राजकारणातील “कोहिनूर” असं म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे एकनिष्ठ खासदार ओम राजेनिंबाळकर यांचं कौतुक केलं आहे.
बाळा नांदगावकर यांची फेसबुक पोस्ट:
सध्याच्या राजकारणातील “कोहिनूर”. नव्या युगातील राजकारण आणि राजकारणी याबद्दल सामान्य जनतेत खूप चांगल्या भावना नाहीत. या वातावरणात सर्वांनाच दिलासा देणारे नाव म्हणजे ओम राजे निंबाळकर हा तरुण खासदार म्हणजे केवळ धाराशिव नव्हे, तर पूर्ण राज्याला आपलासा वाटणारा चेहरा. आदर्श राजकारणी कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण, असं बाळा नांदगावकर यांनी लिहिलं आहे.
Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीला दुसरा धक्का, भाजपही पराभूत; तीन पक्षांच्या अपूर्व युतीसमोर शिंदे पुरुन उरले
अनेक आमिषं, दबाव आला तरी एकनिष्ठ राहून राजकारण केलं. त्यामुळेच सुमारे 3.30 लाख मतांनी निवडून आले. ओमबद्दल मी अनेकदा ऐकून असतो की तो कायम जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी आहे, तसेच सामान्य जनतेचा आधारवड आहे. सध्या पावसाने थैमान घातलं असतानाही केवळ कोरड्या गप्पा न मारता थेट ग्राउंडवर उतरून प्रसंगी लोकांसाठी जीव धोक्यात घालून तो अतिशय पुण्याचे काम करत आहे, अशा शब्दात नांदगावकरांनी त्यांचं कौतुक केलं आहे.या सगळ्याबद्दल ओम तुझे कौतुक करण्यास शब्द कमी आहेत. नवीन पिढीने राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी ओमकडे बघावे आणि गलिच्छ राजकारणातही कोहिनूर हिरा कसा असतो हे लक्षात घ्यावे. बॉलिवूड सेलिब्रिटीला आयडॉल मानणाऱ्या लोकांनी ओम राजेला आयडॉल मानून वाटचाल करायला हवी, असंही बाळा नांदगावकर म्हणतात.
Avinash Soundalkar : राज साहेब बडतर्फ करतील स्वप्नातही वाटलं नाही, मनसे नेत्याची खंत; एक स्वप्न अर्धवट, यापुढे भेटेन तेव्हा…
ओम, तू लोकप्रतिनिधी म्हणून जे जे काही करत आहेस, ते उत्कृष्ट असेच आहे, पण हे करताना तू स्वतः ची काळजी घे, कारण तुझ्यावर लाखो लोक जिवापाड प्रेम करतात आणि या सर्वांसाठी तुझे असणे हे अधिक महत्वाचे आहे, असा सल्ला देताना, राजकारणी म्हणून नव्हे तर ओम राजे तुझा मोठा भाऊ म्हणून मला तुझा खूप अभिमान आहे, असंही बाळा नांदगावकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

