• Fri. Mar 6th, 2026
    Raigad Crime : ‘लग्न कर मग तुला…’; तरूणाचं खोटं प्रॉमिस अन् ज्याची भीती तेच घडलं, रायगडमध्ये खळबळ

    Raigad News : रायगड जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूणीसोबत कायदेशीर विवाह न करता तिला खोटं बोलला, तिनेही विश्वास ठेवला पण सुखी संसाराचं स्वप्न पाहिलं होतं पण सत्य काही वेगळंच होतं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, अलिबाग : रायगड जिल्हासहित राज्यात अल्पवयीन तसेच महिला तरुणी यांना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करीत त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत त्यांना गर्भवती ठेवण्याची अनेक प्रकरण समोर येत आहेत. अशातच आता रसायनी पोलिस ठाण्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

    सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात राहणारी पीडित तरुणी हिला पनवेल तालुक्यातील तक्का येथे राहणारा 19 वर्षीय तरुणाने पीडित तरुणीसोबत दीड वर्षापूर्वी ओळख वाढवली. त्यानंतर तिच्यावर प्रेम असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर आरोपी तरुणाने वारंवार शारीरिक संबंधाची मागणी केली. पिडितेने लग्न करण्याची अट घातली. आरोपीने पीडित तरुणी हिच्या सोबत प्रेमाचा बनाव करीत तिच्याशी वारंवार शरीर संबंध प्रस्थापित केले.
    Maharashtra TimesRaigad Crime : नौदल अधिकारी सुरजसिंह यांचा मृतदेह अखेर सापडला, आठ दिवसांपासून होते बेपत्ता; पोलिसांना वेगळाच संशय
    पनवेल शहरातील तक्का येथील आरोपी याने त्याचे वय १९ वर्षे असतांनादेखील ते वाढवुन २२ वर्षे सांगुन पीडितेसोबत सोबत कायदेशीर विवाह न करता विवाह संस्कार श्री समर्थ विवाह मंगल केंद्र कर्जत या ठिकाणी करून घेतल्याचा आरोप पीडितेन केला. त्यानंतर आरोपीने तिला नांदण्यास न नेता तिला माहेरीच ठेवून तिच्याशी शी तिथे संमतीशिवाय वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यातील झालेल्या शारीरिक संबंधामुळे पिडित तरुणी ही गर्भवती राहिली. पीडित तरुणी ही गर्भवती असल्याच माहिती आरोपी याला देत ती त्याला आरोपी यांच्या घरी नेण्यास सांगत असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेत होता. मात्र आरोपी याने पीडित तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या देवून मनाविरुद्ध गर्भपात घडवून आणला. याबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे पीडितेने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ढोणे करीत आहेत

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा