गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. सदावर्ते आज जालना जिल्ह्यात आले असताना त्यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. तसेच काहींनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेवर बोलताना सदावर्तेंनी जरांगेंना चॅलेंज दिलं.
“काही महत्त्वाची गोष्ट करायला निघाल्यानंतर काही समाजकंटक, अतिरेकी विचाराचे लोक, जरांगेचे दलाल अडथळे आणतात. ज्यांना संविधानच माहित नसतं, नालायक विचाराचे लोक असे भ्याड हल्ले करतात. हे दिवस काँग्रेसचे दिवस नाहीत. अशा जरांगेंच्या दलालांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आंदोलन करायचं, रेतीचे उपसे उचलायचे, त्याच्यापैकी गुणरत्न, जयश्री पाटील नाहीत. त्या गुलगुल्यांना सांगायचंय गुणरत्न रॉयल आहे”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
“जातीत जन्मला म्हणून कुणी रॉयल होत नाही राजेश टोपे. शिक्षणाने रॉयल होणं असतं. मी खानदानी रॉयल आहे. जरांगे बघ माझा जोडा पण लंडनहून आणला आहे. माझी गाडी कुणाकडे नसेल त्या रॉयल गाडीत फिरतोय. मराठा मागासच ठरत नाही हे सुनवायला जालन्याला आलो. जरांगे तुला सांगून चाललो. लकरच गाठ अंतरवाली सराटीत आहे”, असं चॅलेंज सदावर्तेंनी दिलं.
“तू तर सासुरवाडीवासी आहेस. मुली नांदायला पाठवतात. मात्र हा नांदायला सासरवाडीत आला. या पुढे जशास तसं उत्तर देणार. जरांगेंचं दोन समाजाच तेढ निर्माण करणारं सत्र आहे. मुख्यमंत्र्यांना जरांगे हाणूनपाडून बोलला. मग शरद पवारांना झळ का नाही लागली? पडळकर बोलले तेव्हा तुमचा फोन कसा उचलला? मकरंद तू कलाकार आहे. ठिक आहे. गावकी काय आहे रे? गावकी म्हणू नको संविधान म्हण. आरेला कारे उत्तर दिलं जाईल”, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.
“सुप्रिया ताई वोट धनगर के चाहिए, सबके चाहिए, इसलिए राजनितीक बाते करती हैं. राजेश टोपे यांनी उदार अंत:करणाने सांगावे जरांगेच्या आंदोलनात किती टक्के सहभागी आहेत. जरांगे नावाचं जे आर्टिकल आहे तेव्हढंच बोलण्यापूरता आहे का राजेश टोपे?”, असा सवाल सदावर्ते यांनी केला.
“शासन निर्णय काहीच देवू शकत नाही. तिळपापड आहे. ही खालून लागलेली आग आहे. माझ्या मराठ्यांची जरांगे यांनी फसवणूक केलेली आहे. जरांगे राज्य का तुझ्या बापाचं आहे का? तू तर स्वत: सासुरवाडीवासी आहेस”, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

