Buldhana Accident News: बुलढाणा शहरात कामानिमित्त आले होते, ते परत घराकडे निघाले. वाटेत मोठा अनर्थ घडला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
रवी रामेश्वर गिरी (27 वर्ष) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे. गणेश रामदास दांडगे (26 वर्ष), भागवत विलास पवार (वय 26 वर्ष) अशी गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. हे तिघेही दहिद खू. येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. ते तिघे काही वैयक्तिक कामानिमित्त शहरात आलेले तिघे जण आपल्या एमएच 28 एएल 3446 क्रमांकाच्या दुचाकीने घराकडे निघाले होते. दरम्यान, बुलढाणा शहरातील धाड नाका येथून वळण घेतल्यानंतर काही अंतरावरच समोरुन येणाऱ्या एमच 21 बीएच 6695 क्रमांकाच्या पीकअप वाहनाला त्यांची धडक झाली.
रात्री वेगवेगळ्या खोलीत, सकाळी पत्नीची अर्धजळालेली बॉडी सापडली, भाजप नेत्यावर गंभीर आरोप
सदर वाहनाचा चालक नांद्राकोळी येथील जाधव असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी चालविणारा रवी गिरी याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजपूत आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मृतकासह जखमींना सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. यादरम्यान, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, युवानेते मृत्युंजय गायकवाड आणि पृथ्वीराज गायकवाड, ओमसिंग राजपूत यांनी मदतकार्य केले. या घटनेने बुलढाण्यात एकच खळबळ माजली असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर, या तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

