Sharad Pawar Call CM Devendra Fadnavis : भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर बोलताना वडिलांचं नाव घेत खालच्या स्तरावर जात टीका केलीय. आता पवार आक्रमक झाले असून त्यांनी थेट फडणवीसांना फोन केला आहे. नेमकं काय बोलले जाणून घ्या.
गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावर भाजपची प्रतिक्रिया आली आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राजकारणाचा वारसा चालवणारं राज्य आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची वाटचाल पाहिली तर किती आरोप टीका झाली तर त्यांनी सभ्यता सोडली नाही. शरद पवार हे राज्यातले मोठे नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला असेल तर सकारात्मक पद्धतीने दखल घेतीस, अशा घटना घडतात तेव्हा मुख्यमंत्री समज देत असतता. पवार साहेबांच्या फोनची ते दखल घेतील, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
गोपीचंद पडळकर हा फक्त एक मोहरा, हा फडणवीस यांनी राजकारणात आणलेलं एक पाप आणि साप आहे. फडणवीसांनी पुढे येत पडळकरसारख्यांची तोंडं बंद करावीत. नाहीतर पुढे येऊन सांगावं ही हे पाप त्याचंच आहे, असंं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशां जगताप यांनी म्हटलं होतं.
Pune Crime: रोहित ठोक रे यांना, यांची आज विकेटच टाकू; गोळीबारापूर्वी निलेश घायवळ टोळीने काय म्हटलं, त्या रात्री नेमकं काय घडलं?
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
माणसं पाठवली. कशासाठी? गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे. ये बघायला तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे का? अशी टीका पडळकर यांनी केली होती.

