Purandar Taluka Thieves Searched using Drones : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, पुरंदर तालुक्यात एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी गावातील तरुणांची आणि ड्रोनची मदत घेतली. विशेष बाब म्हणजे त्यात त्यांना यश आलं आहे.
दुपारी दौंडज गावातील एका वस्तीवर तिघा चोरांनी दरोडा टाकून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. नीरा येथील थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्यामुळे चोरांची गाडी अडकली आणि ग्रामस्थांनी त्यांना गाठलं. यादरम्यान चोरांनी पाठलाग करणाऱ्या तरुणांना पिस्तुलाचा धाक दाखवून दोनजण पसार झाले. मात्र वाहन चालकाला पकडण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे व पी.एस.आय सर्जेराव पुजारी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पळालेल्या चोरांनी पुणे–पंढरपूर मार्गावरील जेऊर जवळील शेतात आसरा घेतला होता. तेथील शेत उसाने भरलेले असल्याने शोधमोहीम अवघड झाली.
Pune Crime: पुण्यात IT कंपनीसमोर तरुणावर कोयत्याने हल्ला; सत्य समोर आल्यावर पोलीसही चक्रावले, CCTV मध्ये काय दिसलं?
ड्रोनच्या कॅमेऱ्यात चोरांचा ठाव-ठिकाणा
सुमारे दीडशे ते दोनशे स्थानिक तरुणांनी शेताला वेढा घातला. पोलिसांनी धोका टाळण्यासाठी तरुणांना उसात न शिरता फक्त परिसरात पहारा देण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी ड्रोन उडवून शेतातील सर्वेक्षण केले. ड्रोनच्या कॅमेऱ्यात चोरांचा ठाव-ठिकाणा लागला. लगेचच पोलीस पथक व ग्रामस्थांनी मिळून त्यांना पकडलं.
ताब्यात घेतलेले आरोपी
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे लखनसिंग रतपुतसिंग धुधानी (वय 35), बेहतसिंग शामसिंग कल्याणी (वय 30) आणि रत्नेश राजकुमार पुरी (वय 23), अशी त्यांची नावं असून ते सर्व संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून पुढील तपास सुरू असून, उर्वरित दोन साथीदारांविरुद्ध शोधमोहीम सुरू आहे.
पोलिस व तरुणांचे कौतुक
या कारवाईत पोलिसांसोबत संदीप मदने, केशव जगताप, संदीप भापकर, विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, रविराज कोकरे, घनश्याम चव्हाण, प्रसाद कोळेकर आदींनी सक्रिय सहभाग घेतला. प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे म्हणाले, ‘स्थानिक तरुणांनी पोलिसांना चांगलं सहकार्य केल्यामुळे चोरांचा बंदोबस्त करणं शक्य झालं. अशा प्रकारे लोकांचा पाठिंबा लाभला, तर कार्यक्षेत्रातील चोरीच्या घटनांवर आळा घालणं सोपं जाईल’.

