Eknath Shinde News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुख्य कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुख्य कार्यकारी समिती जाहीर करण्यात आलीय.
उद्धव ठाकरे यांची हीच ताकद कमकुवत करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना कामाला लागली आहे. कारण आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा पराभव केला तर शिंदेंसाठी तो फार मोठा विजय असेल. त्यासाठी त्यांनी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
एकनाथ शिंदे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपल्या शिलेदारांना कामाला लावलं आहे. या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळावा यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना जबाबदारी दिली आहे. यासाठी 21 प्रमुख नेत्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला मुख्य कार्यकारी समिती असं नाव देण्यात आलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून 21 प्रमुख नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती आज जाहीर करण्यात आली आहे.
आगामी काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या दोन्ही भावांची युती झाली तर मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही भावांचा एकत्रित सामना करणं हे एकनाथ शिंदे यांना भारी पडू शकतं. विशेष म्हणजे भाजपला देखील मुंबई महापालिकेत सत्ता हवी आहे. यासाठी भाजपकडूनदेखील मोर्चेबांधणी सुरु आहे. शिंदेंची शिवसेना आणि भाजप मित्रपक्ष असले तरी त्यांच्यात एक अघोषित अशी स्पर्धा असणार आहेच. पण त्यापेक्षा जास्त ठाकरे बंधूंचं आव्हान दोन्ही पक्षांना असणार आहे. यामुळे एकनाथ शिंदे आतापासूनच कामाला लागले आहेत.
शिवसेनेची मुख्य कार्यकारी समितीमधील नेत्यांची नावे :
- एकनाथ शिंदे, मुख्य नेते
- रामदास कदम, नेते
- गजानन कीर्तीकर, नेते
- आनंदराव अडसूळ, नेते
- मीनाताई कांबळे, नेत्या
- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
- रवींद्र वायकर, खासदार
- मिलिंद देवरा, राज्यसभा – खासदार
- राहुल शेवाळे, माजी खासदार
- संजय निरुपम, माजी खासदार
- प्रकाश सुर्वे, आमदार
- अशोक पाटील, आमदार
- मुरजी पटेल, आमदार
- दिलीप लांडे, आमदार
- तुकाराम काते, आमदार
- मंगेश कुडाळकर, आमदार
- श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार
- सदा सरवणकर, माजी आमदार
- यामिनी जाधव, माजी आमदार
- दीपक सावंत, माजी आमदार
- शिशिर शिंदे, माजी आमदार

