Pune Gang war : बंडू आंदेकर याच्यासह इतर आरोपींना पोलिसांनी मंगळवारी कोर्टात हजर केलं. यावेळी कोर्टात काय-काय घडलं? या विषयी सविस्तर माहिती समोर आली आहे. तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात यावेळी सविस्तर माहिती दिली.
बंडू आंदेकर याने कोर्टात आपला या हत्येशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं. आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा बंडू आंदेकर यांनी केला. घटना घडली तेव्हा आपण केरळला होतो, असंही बंडू आंदेकर म्हणाला. पण बंडू आंदेकर याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी खोडून काढला. हत्या नेमकी कशी झाली, याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली.
आयुष कोमकर याच्या हत्येचा एकूण 13 जणांनी कट रचला होता, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली. यापैकी 13 पैकी 2 जणांनी पुण्याच्या भवानी पेठेत जात आयुष कोमकरच्या घराखाली असलेल्या पार्किंगमध्ये जात गोळीबार केला होता. त्यांनी आयुषचा खून केला. बाकी आरोपींच्या सांगण्यावरुन दोन आरोपींनी खून केला. आता या प्रकरणात आरोपींनी हत्येसाठी वापरलेली पिस्तूल आम्हाला जप्त करायची आहे. आरोपींनी पिस्तूल कुठून आणल्या तसेच त्याच्या गोळ्याही कुठून आणल्या याचाही तपास करायचा आहे. याशिवाय इतर 5 आरोपी देखील फरार आहेत. त्यांचा शोध घ्यायचा आहे. ते आरोपी कुठे गेले याबाबतची माहिती याच आरोपींकडे आहे. त्यामुळे त्यांना शोधायचं आहे, असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आणणारी माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली. आरोपींनी सोमनाथ गायकवाड याच्या घराचीदेखील रेकी केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सखोल तपास करायचा आहे. आंदेकर टोळीने सोमनाथ गायकवाड याच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची ओळख परेड घ्यायची आहे, असं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं.
पुणे गँगवॉर! ‘मी माझ्याच नातवाला का संपवू?’; बंडू आंदेकरचा कोर्टात सवाल, वाचा A टू Z युक्तिवाद
“सखोल तपास करायचा आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींनी सोमनाथ गायकवाड याच्या घराची देखील रेकी केली होती. त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. आंदेकर टोळीने हा खून केला आहे. आंदेकर टोळीने याआधी आंबेगावमध्ये सोमनाथ गायकवाड याच्या घरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची ओळख परेड घ्यायची आहे”, असं तपास अधिकारी म्हणाले. याशिवाय या प्रकरणातील अनेक आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. अनेकांवर दोन ते तीन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. हे एक गँगवॉर आहे. आरोपींनी कट रचून खून केला आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली.

