Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी काही चोरट्यांनी त्यांचं मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा प्लॅन धुळीस मिळाल. यावेळी मंगळसूत्राच्याऐवजी त्यांच्या हातात त्या महिलेची ओढणी आली. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतलं आहे .
किरण राजू शिंदे (वय 36, रा. कांदा मार्केट श्रीरामपूर) आणि मुनीर युसुफ शेख (वय 32, रा. दत्तनगर श्रीरामपूर जि.अहिल्यानगर) अशी चोरट्यांची नावे आहेत. या प्रकरणी शितल विशाल दांगोडे (वय 26, रा. रचना कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. शितल यांनी फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, शितल या रचना कॉलनीमध्ये कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा शहरातील एका शाळेमध्ये शिकतो. दरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोराची शाळा सुटणार असल्यानं शितल या मुलाला घेण्यासाठी शाळेत गेल्या. शाळेतून मुलाला घेऊन परतत असताना लाडगाव रोडवर दोन दुचाकीस्वार उभे होते. त्यांनी शितल यांना बघून दुचाकी सुरू केली. काही करण्याच्या आत त्यांनी मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या हातात मंगळसूत्र लागतात शीतल यांची ओढणी लागली. हा संपूर्ण प्रकार अचानक घडल्याने शितल यांनी आरडाओरड केला. यामुळे चोरटे घाबरून धूम ठोकण्याच्या प्रयत्नात होते.
Beed Crime : डोक्याला गोळी लागलेली, कारमध्ये संशयास्पद बॉडी, बीडमधल्या उपसरपंचाचा सोलापूरमध्ये मृत्यू; घटनेला तमाशाची किनार
शितल यांचा आरडाओरड ऐकून नागरिक जमले त्यांनी तात्काळ पळून जाणाऱ्या किरण व मुनीर या दोघांना पकडलं. यावेळी जमलेल्या नागरिकांनी दोन्ही चोरट्यांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर काही स्थानिकांनी ही माहिती वैजापूर पोलिसांनी दिली घटनेची माहिती मिळतच वैजापूर पोलीस ठाण्याचं अंमलदार ज्ञानेश्वर मेटे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जमावाच्या तावडीतून आरोपींची सुटका करून त्यांना वैजापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी शितल यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी चोरीसाठी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

