• Fri. Mar 6th, 2026
    ‘स्वाभिमान पैशांपेक्षा मोठा असतो’, पूरग्रस्त मुलानं पैसे नाकारले घेतलं फक्त पाणी, पंजाबमधील व्हिडीओ व्हायरल

    Punjab Emotional Viral Video: पंजाबमधील महापुरात अडकलेल्या एका लहान मुलाने पाण्याची बाटली घेतली पण पैसे नाकारले, हे दृश्य स्वाभिमान आणि माणुसकीचं प्रतीक ठरलं. संकटातही संस्कार टिकून राहतात, हे या मुलांनी सिद्ध केलं. समाजमाध्यमांवर या घटनेचं कौतुक आणि चर्चाही सुरू आहे.

    पंजाबमध्ये आलेल्या महापुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. १३०० हून अधिक गावं पाण्याखाली गेली असून, २.५ लाख एकर शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या कठीण परिस्थितीत एनडीआरएफ आणि सैन्याच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

    याच पार्श्वभूमीवर, एका लहान मुलाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे. एका समाजसेवकाने त्या मुलाला पाण्याची बाटली आणि काही पैसे देऊ केले. परंतु, मुलाने केवळ पाण्याची बाटली घेतली आणि पैसे घेण्यास नम्रपणे नकार दिला. त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा स्वाभिमान पाहून त्या व्यक्तीलाही आश्चर्य वाटले आणि त्याने त्या मुलाचं कौतुक केले.

    अवघ्या १० सेकंदांच्या या व्हिडिओतील मुलाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येईल. लोक म्हणत आहेत, ‘स्वाभिमान पैशांपेक्षा मोठा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.’
    (फोटो सौजन्य – thelogicalindian/Instagram)

    नेमकं घडलं तरी काय?

    नेमकं घडलं तरी काय?

    हा व्हिडीओ @thelogicalindian या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की तो मुलगा फार फार तर चार ते पाच वर्षांचा दिसतो. त्याच्या घरात पाणी शिरले आहे. घरातील वस्तू वाहून गेल्या आहेत. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही. अशा स्थितीत तो अडकलेला आहे. अशा वेळी पैसे पाहून कोणाचेही डोळे चमकतील. पण त्या मुलाने पैशांना हात लावला नाही; फक्त पाण्याची बाटली घेतली. तेवढ्यात पाठीमागून त्याची बहिण आली. तिनेही पैसे घेण्यास साफ नकार दिला. खरं तर ही मुलं फार लहान आहेत, पण इतक्या लहान वयात त्यांनी दाखवलेला स्वाभिमान पाहून स्वयंसेवकही हैराण झाले. आणि त्यांच्या डोळ्यांत नकळत अश्रू तरळले.
    (फोटो सौजन्य – thelogicalindian/Instagram)

    हा व्हिडीओ होतोय व्हायरल

    ​ ​

    हा व्हिडीओ १ लाख ७६ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शिवाय अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत त्या मुलाचं कौतुकही केलं आहे. कोणी त्या मुलांच्या आई-वडिलांचं कौतुक करत आहे, कारण त्यांनी मुलांवर खूप चांगले संस्कार केले आहेत. तर कोणी पैसे न देता फक्त खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा गरजेच्या वस्तू देण्याचा सल्ला स्वयंसेवकांना देत आहे. असो, या प्रकरणी तुमचं मत काय आहे? तुम्हीही आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या.

    मंदार गुरव

    लेखकाबद्दलमंदार गुरव“मंदार हा एक कुशल कंटेन्ट रायटर आहे. तो व्हायरल सेक्शनसाठी लिखाण करतो. त्याच्याकडे ७ वर्षांचा अनुभव आहे. व्हायरलसोबतच तो खेळ, मनोरंजन आणि राजकारण या विषयांवरही लिखाण करतो. आपल्या वाचकांना अचूक माहिती देण्यासाठी तो विविध विषयांवर संशोधन करतो. यापूर्वी त्याने प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही काम केले आहे.

    मंदारला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचायला खूप आवडते. सोबतच त्याने विनोदी कथा, रहस्य कथा, विज्ञान कथा, भय कथा यांसारख्या विविध विषयांची पुस्तकं वाचली आहेत. वाचनासोबतच चित्रपट आणि नाटके पाहायला सुद्धा आवडतात. विशेषत: भय आणि विनोद या पठडीत मोडणाऱ्या कलाकृतींमध्ये विशेष रस आहे. तसेच मंदार फावल्या वेळेत कविता लिहिण्याची सुद्धा आवड आहे.

    मंदार आपल्या वाचकांची आवड आणि रूची समजून त्या अनुशंगाने लिखाण करतो. मंदारच्या लिखाणाची शैली ही फारच साधी आणि सोपी आहे. त्यामुळे त्याचे लिखाण लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातले लोक वाचू शकतात. वाचकांना अचूक माहिती देण्यासाठी मंदार वचनबद्ध आहे. आपल्या सर्जनशील लिखाण शैलीमुळे तो टीममधील एक महत्वाचा सदस्य आहे.”… आणखी वाचा