E-bike Taxi Marathi News : ई-बाईक टॅक्सी सेवा बंद करून सरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असली तरी Rapido, Ola आणि Uber सारख्या कंपन्या सरकारचे आदेश असूनही अनधिकृतपणे बाईक टॅक्सी सेवा सुरू ठेवत आहेत. सरकारने मोठी कारवाई केली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देश मोटर परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. ई-बाईक टॅक्सी धोरण निश्चित करण्याची फाईल विधी व न्याय विभागात विचाराधीन आहे आणि लवकरच निर्णय घेतला जाईल. “मी मोटर परिवहन विभागाला सरकारच्या आदेशांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत,” असे सरनाईक म्हणाले.
Mumbai News: कर्जबाजारी टॅक्सीचालकांचा संताप! Ola, Uber आणि Rapido सारख्या ॲप्स विराधात आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र सरकारने बाईक टॅक्सी सेवा चालवणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अनेक दिवसांपासून या कंपन्या विना परवाना सेवा देत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने ही कारवाई केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “मुंबई महानगर प्रदेशात परवाना न घेता बाईक टॅक्सी aggregator सेवा सुरू असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. सरकारने अशा सेवा परवाना मिळेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “आदेश मिळाल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करून सेवा चालवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मी मोटर परिवहन विभागाला सरकारच्या आदेशांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.”
ओला, उबर आणि रॅपिडोसाठी नवीन नियम जारी, सरकारने उचलले हे पाऊल
सध्या ई-बाईक टॅक्सी ॲग्रीगेटर धोरण निश्चित करण्याची फाईल विधी व न्याय विभागात विचाराधीन आहे. लवकरच यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. “ई-बाईक टॅक्सी ॲग्रीगेटर धोरण निश्चित करण्याची फाईल विधी व न्याय विभागात विचाराधीन आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत संबंधित कंपन्यांनी त्यांच्या बाईक सेवा बंद करून सरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असली तरी Rapido, Ola आणि Uber सारख्या ॲग्रीगेटर कंपन्या सरकारचे आदेश असूनही अनधिकृतपणे बाईक टॅक्सी सेवा सुरू ठेवत आहेत,” असेही सरनाईक यांनी सांगितले.

