Beed Accident: बीड जिल्ह्यातील नामलगाव फाट्याजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले असून यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसंच दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व लोक देवदर्शनासाठी पायी निघाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी बीड-धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर नामलगाव फाट्याजवळ एक हा अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने रस्त्याने पायी जाणाऱ्या सहा जणांना चिरडले असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तसंच दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हे सर्व लोक बीड जिल्ह्यातील पेंडगाव येथे दर्शनासाठी पायी जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला. काही दिवसांपूर्वी गढी उड्डाणपुलाजवळही असाच अपघात झाला होता. त्यात कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या परिसरात सतत भीतीचे वातावरण असते. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
‘आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करु नका, तुमचं तोंड भाजेल’, देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा
विशाल श्रीकिसन काकडे (रा. शेकटे, ता. शेवगाव, जि. अहमदनगर), अमोल नामदेव गरजे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव), आकाश कोळसे, पवन जगताप, किशोर तोर (रा. बाबुलतरा, ता. गेवराई) ही मृतांची नावे आहेत. आणखी दोन जणांचा मृतांमध्ये समावेश झाला असून नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
दरम्यान, अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास करत कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

