Mumbai Traffic Change: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले असून आंदोलकांनी आरक्षण मिळेपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंदी (आवश्यकतेनुसार) आणि वाहने उभी करण्यास मनाई असलेले मार्ग व अवजड वाहने यांना आज 29 ऑगस्टपासूनपासून पुढील आदेशापर्यंत बंदी राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.
कोणते मार्ग बंद राहतील?
– वाशीकडून फ्रीवेकडे जाणारा मार्ग. वाशीकडून येणाऱ्या साऊथ बॉण्डने पांचरपोळ-फिवेकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध असल्याचं सांगण्यात आलं आहे.
– वीर जिजाबाई भोसले मार्गावरून ट्रॉम्बेकडे जाणारा मार्ग.
– छेडानगरवरून फ्री वेकडे जाणारा मार्ग.
पर्यायी मार्ग:
– वाशीहून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ बॉण्डने मानखुर्द टी जंक्शन ब्रीज स्लीप रोडने उजवे वळण घेऊन वीर जिजाबाई भोसले मार्गाने आय ओ सी जंक्शन व छेडानगर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील.
– घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडने जाणारी वाहने छेडानगर मार्गाने मुंबईत प्रवेश करतील.
– छेडानगरवरून फ्रीवेकडे जाणारी वाहने अमरमहल, नेहरूनगर ब्रीजमार्गे जातील.
दरम्यान, सदर आदेश आजपासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहणार आहेत, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

