Pune Metro News : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर माण डेपो ते म्हाळुंगे बालेवाडी दरम्यान मेट्रो चाचणी यशस्वी झाली. 23.3 किलोमीटर लांब हा मार्ग असून याचं 90 टक्क्यांहून अधिक पूर्ण झालं आहे. कुठे, कशी असणार स्थानकं?
मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याशी शक्यता
माण, हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणारा एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या ‘ पुणे मेट्रो लाइन ३ ’ प्रकल्पाचे काम ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, उर्वरित काम अंतिम टप्यात आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), टाटा आणि सीमेन्स समूहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत विकसित केलेला हा प्रकल्प प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पाच्या कामास २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली असून, या कामाची मुदत मार्च २०२६ पर्यंत आहे.
२३ किमीचा मार्ग, २३ स्थानकं
पुणेरी मेट्रोचा २३.३ किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरमध्ये २३ स्थानके आणि विद्यमान मेट्रो मार्गांसह एकसंध इंटरचेंज असणार आहे. त्यामुळे पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी जलद, सुरक्षित वाहतुकीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
पुणे-नाशिक महामार्ग एलिव्हेटेड होणार, दोन तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर; कुठून, कसा असणार मार्ग?
चार आधुनिक ट्रेनचा सेट दाखल
या प्रकल्पासाठी चार आधुनिक मेट्रो ट्रेनचा सेट आला आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये तीन पूर्णपणे वातानुकूलित डबे असून, त्याची एकूण प्रवासी क्षमता अंदाजे एक हजार आहे. या गाड्या ताशी ८० किलोमीटर वेगाने धावणार आहेत.
पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी; भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी कोणतं नाव सुचवलं?
मेट्रो बालेवाडीपर्यंत पहिल्यांदाच धावली
या मेट्रोची पहिली चाचणी चार जुलैला घेण्यात आली होती. त्यानंतरची ही चौथी चाचणी असून, मेट्रो पहिल्यांदाच बालेवाडीपर्यंत धावली. माण डेपोपासून ते म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलाजवळील स्थानक क्रमांक १० पर्यंत चाचणी यशस्वी पार पडली. या वेळी मेट्रोचा ताशी वेग प्रतितास ४० किमोमीटर होता. या चाचणीवेळी मेट्रोचे अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ उपस्थित होते.

