• Thu. Jun 18th, 2026

    ‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, अनेकांच्या शिव्या ऐकत आहे’; चित्रा वाघ यांचं मनोज जरांगेंना जोरदार प्रत्युत्तर

    ByMH LIVE NEWS

    Aug 27, 2025 #Chitra Wagh
    ‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, अनेकांच्या शिव्या ऐकत आहे’; चित्रा वाघ यांचं मनोज जरांगेंना जोरदार प्रत्युत्तर
    मुंबई 
    भाजप नेत्या तथा विधानपरिषद आमदार चित्रा वाघ यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला जोरादरा प्रत्युत्तर दिलंय. चित्रा वाघ यांनी ‘जे बोलले ते मी ऐकलं, पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही रोज मी अनेकांच्या शिव्या ऐकत आहे’, असं उत्तर मनोज जरांगे यांना दिलं. ‘मनोज जरांगे यांनी माझ्यावर टीका केली. गबाळं उचकीन म्हणाले जे उचकायचं ते उचका, मी त्यांना घाबरणारी नाही, माझं नाव चित्रा वाघ आहे,’ असं त्या यावळी म्हणाल्या.

    मी कोणाच्या बापाला घाबरत नाही

    चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, ‘ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या आईवर टीका झाली ते महाराष्ट्राला पटणार नाही. आम्हाला तुमच्याबद्दल देखील आदर आहे तुम्ही एका समाजाला पुढे घेऊन जाताय, आरक्षणासाठी मोठं काम करताय. आरक्षण जर कोण देणार तर देवेंद्र फडणवीसच देणार’, असं देखील त्यांनी बोलून दाखवलं.

    ‘मनोज जरांगे यांनी त्यांचे शब्द मागे घेतले असं मला कळलं. असं असेल तर स्वागत आहे. केवळ पुनरावृत्ती होऊ नये एवढी आमची अपेक्षा’ असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. ‘मी बाप्पााच्या आगमनाच्या तयारीला लागली होते, म्हणून थांबले होते. ते जे बोलले ते मी ऐकलं पण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. रोज मी अनेकांच्या शिव्या ऐकत आहे. दुसरे कोणी मुख्यमंत्री असते आणि त्यांच्या आईला कोणी बोललं असतं तरी आम्ही सहन केलं नसतं’, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

    जे उचकायचं ते उचका

    चित्रा वाघ म्हणाल्या की, ‘मनोज जरांगे यांनी माझ्यावर टीका केली, गबाळं उचकीन म्हणाले, जे उचकायचं ते उचका, मात्र मी काही त्यांना घाबरणारी नाही माझं नाव चित्रा वाघ आहे. गेली २७ वर्ष मी राजकारणात, समाजकारणात काम करते आहे आणि मी आमदार आहे हे त्यांना माहीत नसेल. मी आमदार असले काय नसले काय जे काम करायला पाहिजे ते मी करत राहणार’, असंही वाघ यांनी स्पष्ट केलं.

    ‘मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा लढा सुरू ठेवावा, कोणाच्या आया बहिणींना मध्ये आणू नका एवढेच मला सांगायचं आहे. आम्ही किती प्रतिकूल परिस्थितीतून आलोय हे जरांगे ना कुठे माहिती आहे. घाणेरड्या पद्धतीने मला शिवीगाळ केली गेली, जे करायचं ते करा, मला फरक पडत नाही. माझं नाव चित्रा वाघ आहे, माझं काम मी करत राहणार’, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed