• Wed. Jul 1st, 2026

    लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने

    ByMH LIVE NEWS

    Aug 25, 2025
    लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने
    बीड
     बीडच्या गेवराईत मोठा राडा झाला. गेवराईत एका बॅनरवरुन हा राडा झाला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी एकमेकांकडे चप्पल भिरकवण्यात आली. विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाच्या समर्थनार्थ बॅनर लावला होता. त्यावर लक्ष्मण हाके यांनी आक्षेप घेत टीका केली होती. यावरुन वाद तापलेला असताना लक्ष्मण हाके आज गेवराईत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आले. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि मोठा राडा झाला. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले.विजयसिंह पंडित यांचे दोन दिवसांपूर्वी गेवराईत मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागले होते. त्यावर लक्ष्मण हाके यानी टीका करत विजयसिंह पंडित यांना आव्हान दिलं होतं. यानंतर आज लक्ष्मण हाके आपल्या कार्यकर्त्यांसह गेवराईत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आले. यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक केल्याची देखील माहिती आहे.

    दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे मोठा राडा झाला. दोन्ही बाजूने दगडफेक झाली. लक्ष्मण हाकेंच्या दिशेला चप्पल भिरकावली गेली. दोन्ही गटाकडून दंडुक्यांची भाषा वापरली गेली. यावेळी पंडित समर्थकांनी हाके यांचा पुतळा देखील जाळल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. लक्ष्मण हाके आता बीडच्या दिशेला मार्गस्थ झाले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed