Chhatrapati Sambhajinagar Murder News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जागा हडपण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेनं संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. राज्यात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नसल्याचं अशा घटनांवरुन कळतं.
प्रमोद पाडसवान (वय ३८ रा. संभाजी कॉलनी असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. रमेश पाडसवान आणि रुद्र पाडसवान हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पाडसवान कुटुंब हे सिडको एन ६ भागातील संभाजी कॉलनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहतं. त्यांच्या घराशेजारी किराणा दुकान आहे. घराच्यासमोर त्यांनी एक मोकळा भूखंड सिडकोकडून विकत घेतला आहे. मात्र याच भूखंडावर निमोणे कुटुंबाचा डोळा होता. काही दिवसांपासून निमोणे कुटुंबाने या प्लॉटवर अतिक्रमण करायला सुरुवात केली. पाडसवान कुटुंबाने निमोणे यांना तीव्र विरोध केला. यामुळे निमोणे कुटुंबाने पाडसवान कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली. वाद होऊ नये आपली जागा आपल्यालाच राहावी यामुळे पाडसवान कुटुंबाने मोकळ्या भूखंडावर बांधकाम करण्यासाठी साहित्य आणले कामाला सुरुवात देखील केली होती.
मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली, मुंबईत मोठ्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
मात्र याचवेळी निमोणे कुटुंबाने याच भूखंडावर शेड बांधायला सुरुवात केली. सण उत्सवाच्या दिवसांमध्ये वाद नको म्हणून काही नागरिकांनी यात मध्यस्थी केली. मात्र पाडसवान कुटुंबाबाबत कायम खुमखुमी असलेल्या काशिनाथ निमोणे, ज्ञानेश्वर निमोणे, सौरभ निमोणे व गौरव निमोणे यांनी पाडसवान कुटुंबावर चाकूने हल्ला केला. यात प्रमोद पाडसवान, रमेश पाडसवान, रुद्र पाडसवान हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे वडील आणि मुलगा हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
Nagpur Crime News : फॉर्च्युनरच्या छतावर जाऊन बसला, मध्यरात्री जीवघेणा स्टंट, सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
पत्नी समजून पित्याकडून पोटच्या मुलीवर अत्याचार
पत्नी बचत गटाच्या हप्ता भरण्यासाठी गेली असताना जन्मदात्या पित्यानेच मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलींना हा संपूर्ण प्रकार आईला सांगितल्यानंतर पत्नीने नाराधाम पतीचे हात झाल्याने झोडून काढले. दरम्यान या प्रकरणी अतिप्रसंग करणाऱ्या नराधाम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

