Solapur Rain News : सोलापुरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पुलांवर पाणी आल्याने गावांचा शहराशी संपर्क तुटला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले
मागील चार दिवसात दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने सर्वत्र झोडपून काढलं आहे. या पावसामुळे नद्या – नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे अनेक गावात नदी आणि ओढ्यांना पूर सदृश्य परिस्थिती आली आहे. नदी – ओढ्यांवर आलेल्या पुरामुळे बक्षी हिप्परगे ते सोलापूर जिल्ह्यातील वरळेगांव, वडजी आणि मराठवाड्यातील सीमावर्ती भागातील खडकी धोत्री या मार्गाची वाहतूक खंडित झाली आहे.
धुळ्यात अवकाळी पाऊस, आमदार काशीराम पावरांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे गावाचा सोलापूर शहराशी असलेला संपर्कही खंडित झाला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणी साचलं असून त्यामुळे खरिपातील तूर, उडीद, सोयाबीन, मुग यासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

