Chhatrapati Sambhajinagar Girl Body Found in Well : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रक्षाबंधनाला माहेरी आलेल्या महिलेचा आपल्या वडिलांच्या विहिरीतच मृतदेह आढळला आहे.
छाया अंकुश उबाळे (वय ३३, रा. जटवाडा, ता. छत्रपती संभाजीनगर) असं मृतदेह आढळलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया उबाळे या जटवाडा भागात पती दोन मुले यांच्यासह राहत होत्या. छाया पाच दिवसांपूर्वी फुलंब्री तालुक्यातील कान्होरी येथे माहेरी आई-वडिलांकडे भेटण्यासाठी आल्या होत्या. शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास रक्षाबंधन असल्यानं भाऊ बहीण राखी बांधेल याची वाट बघत होते. मात्र राखी बांधण्यापूर्वीच छाया बेपत्ता झाल्या. यामुळे वडील व नातेवाईक यांनी छाया यांची शोधाशोध केली. मात्र त्या आढळून आल्या नाहीत. दरम्यान या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाणे गाठून बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी शोध मोहीम राबवल्यानंतर छाया यांचा मृतदेह त्यांच्याच वडिलांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. पोलीस व नागरिकांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. तात्काळ ग्रामीण रुग्णाला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. त्यांच्यावर दोन वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
Nagpur News : नागपूरमध्ये टू-व्हीलरवर बायकोची बॉडी बांधून घेऊन निघालेला पती, कारण ऐकून तुमचंही मन हेलावेल, Video तुफान व्हायरल
माहेरी आलेल्या छाया यांचं अचानक बेपत्ता होणं त्यानंतर त्यांचा विहिरीत मृतदेह आढळणे यामुळे गावात खळबळ उडाली आहे. छाया यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली? आहे याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. माहेरी आलेल्या मुलीचा वडिलांच्या विहिरीत मृतदेह आढळल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.

