Sadabhau Khot : विधानसभेच्या १६६ जागा जिंकून देण्यासाठी दोन लोक माझ्याकडे आले असल्याचा दावा शरद पवार यांनी केला होता. यावरून आता आमदार सदाभाऊ खोत यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.
खबर छुपाई जाती है… अफवाह उड़ाई जाती है… जनतेनं नाकारलेले नेते आता लोकशाहीच्या छातीत खंजीर खुपसत आहेत. पवार साहेब, खरं असेल तर इतके दिवस गप्प का बसलात? की स्क्रिप्ट आता मिळाली..? असा खोचक सवाल सदाभाऊ खोत थेट शरद पवार यांना विचारला आहे. मात्र आता या विधानानंतर शरद पवार यांचा नेमका रोख कोणाकडे आहे त्याला कोण दोन जण भेटले होते? या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. निवडणुकीनंतर ईव्हीएमवर महाविकास आघाडीचे नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आला होता. मात्र ईव्हीएम प्रक्रिया पूर्णपणे निर्दोष असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
Sharad Pawar : ‘विधानसभेच्या १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो, ते दोघे…’; शरद पवार यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शरद पवार यांच्या विधानाचा सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतल्यानंतर आता ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार सदाभाऊ खोत यांचे टीकेला कोणते उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार यांनी आज नागपूर येथे मला दोन जण भेटले होते अशा स्वरूपाचे विधान केल्याने ह्या विधानाचे आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मात्र पवार यांचा महाविकास आघाडीतील कोणत्या नेत्याकडे रोख होता याच्या चर्चा आता रंगल्या आहेत.
